Rohan khaunte| Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: जुन्या गोव्यात 'मॉल'चा वाद; 'विरोध करणं सोपं, काम करणं अवघड' पर्यटनमंत्र्यांचे अफवा पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर

Goa Assembly Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी राज्याच्या पर्यटनमंत्र्यांवर याच मुद्याला धरून शाब्दिक वार केला

Akshata Chhatre

Goa Budget Session 2025: सध्या जुने गोव्यात पर्यटन विभागाच्या विकास प्रकल्पादरम्यान पोर्तुगीजकालीन शस्त्रागारातील तोफगोळे सापडल्याने राज्यात खळबळ उडालीये. गोव्यात सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी राज्याच्या पर्यटनमंत्र्यांवर याच मुद्याला धरून शाब्दिक वार केला. याला उत्तर देताना पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी प्रसाद योजनेअंतर्गत जुने गोवे येथे पर्यटकांसाठी सुविधा केंद्र उभारण्याच्या योजनेला अंतिम स्वरूप देताना, बेसिलिका आणि आर्चडायोसीसह चर्च प्रशासनाला विश्वासात घेण्यात आले असल्याचे स्पष्टीकाण दिलेय.

काही दिवसांपूर्वी आंदोलकांकडून युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेल्या बेसिलिका ऑफ बॉम जीझसजवळ प्रस्तावित मॉल प्रकल्प उभा राहणार असा मुद्दा धरून आंदोलन सुरु केले होते. विरोधीपक्षनेते विजय सरदेसाई यांनी देखील अधिवेशनात हा मुद्दा समोर आणला.

मात्र जुन्या गोव्यात चर्च जवळ सुरु होणाऱ्या बांधकामाबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे आणि अशी चुकीची माहिती परसण्यापासून रोखण्यासाठी मी अफवेच्या मुळाशी जाण्याचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत असेही खंवटे यांनी सांगितले.

स्पष्टीकरण दिल्यानंतर पर्यटनमंत्रीनीं विरोधकांना टोला लावत म्हटलं की “तुम्हाला रस्ता बांधायचा असेल, तर तुम्हाला ५० लोकं देखील सापडणार नाहीत, पण तोच रस्ता थांबवायचा असेल, तर भली मोठी गर्दी पाठिंबा देण्यासाठी तयार राहील.

" संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेष प्रदर्शनाच्या सोहळ्या दरम्यान बफर झोनच्या आत आणि बाहेर ३०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली होती, त्यावेळी या कामांवर कोणताही आक्षेप घेण्यात आला नाही. सध्या जुने गोव्यातील चर्चला भेट देणाऱ्या पर्यटकांना मदत करण्यासाठी आम्ही सुविधा केंद्र तयार करत आहोत, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले.

जुने गोव्यातील प्रस्तावित विकासकामांवरून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री खंवटे यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे सुविधा केंद्र पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी बांधले जात आहे, आणि यात सरकारची कोणतीही व्यापारी इमारत किंवा मॉल बांधण्याची योजना नाही.

'विकासकामांना विरोध करणं सोपं आहे, काम करणं अवघड'
पर्यटनमंत्री खंवटे

काही लोकं या प्रकल्पाबाबत चुकीची माहिती पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहेत. या प्रकल्पावर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना, खंवटे म्हणाले की, विकासकामांना विरोध करणं सोपं आहे, पण लोकांना सुविधा पुरवण्यासाठी काम करणं अवघड आहे. जुने गोव्यातील पर्यटकांना चांगली सुविधा मिळावी, यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं म्हणत पर्यटनमंत्र्यांनी सरदेसाईंच्या वाराला उत्तर दिले.

चर्चला आणखीन सुविधा नको असतील, तर तसे कळवावे

जुने गोव्यातील ‘अ‍ॅमेनिटी फॅसिलिटेशन सेंटर’चे काम चर्च आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) मंजुरीशिवाय पुढे जाणार नाही, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले आहे. जर चर्चला या ठिकाणी आणखीन सुविधा नको असतील तर त्यांनी तसे कळवावे, असेही खंवटे यांनी स्पष्टपणे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT