Old Goa Illegal Constructions Gainik Gomantak
गोवा

Old Goa Illegal Constructions: जुने गोवेतील बेकायदा बांधकामाविरोधात राष्ट्रीय नेत्यांची मदत घेणार; तृणमूल काॅंग्रेसचा लढा

तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत जुने गोवे येथील वारसास्थळी बांधलेल्या अवैध बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला होता.

दैनिक गोमन्तक

Old Goa Illegal Constructions: तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत जुने गोवे येथील वारसास्थळी बांधलेल्या अवैध बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे पुरातत्व खात्याने (एएसआय) हे बांधकाम पाडण्याचा आदेश जारी केला होता.

परंतु या आदेशाला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सरकार या प्रकरणाला न्याय देण्यात अपयशी ठरले.

मात्र, न्याय मिळेपर्यंत आम्ही लढणार असून गरज पडल्यास पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची मदत घेऊ, असे तृणमूलचे प्रसार माध्यम समन्वयक ट्रोजन डिमेलो यांनी सांगितले.

पणजी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तृणमूलच्या अल्पसंख्याक विभागाचे समन्वयक व्हिन्सेंट फर्नांडिस आणि पक्षाचे प्रवक्ते पीटर अफोन्सो उपस्थित होते. ‘एएसआय’ने कायदेशीर प्रक्रिया योग्यरित्या न केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

बांधकाम केलेल्यांना नोटीस न बजावल्याने त्यांना नैसर्गिक न्याय न मिळाल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. मात्र, बांधकाम पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा डिमेलो यांनी दिला.

केंद्राकडे पाठपुरावा करणार

डिमेलो म्हणाले, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता खासदार महुआ मोईत्रा आणि राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन ते केंद्रातील संबंधित अधिकारिणींकडे घेऊन जातील. या प्रकरणात गोमंतकीयांना न्याय मिळेल, याची खात्री केली जाईल.

तृणमूल काँग्रेस या लढ्यात संबंधित ''एनजीओ'' आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आम्ही न्याय मिळेपर्यंत लढा देण्यास कटिबद्ध आहोत. प्रवक्त्या ॲना ग्रासियस आणि बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध लढणाऱ्या सर्व संबंधित नागरिकांच्या प्रयत्नांचे डिमेलो यांनी कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT