Sunburn festival will not be organized this year amidst corona pandemic Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival 2022 : अधिकाऱ्यांना बसणार खंडपीठाची चपराक; कारवाईबाबत सवाल

सनबर्न ईडीएम महोत्सव ध्वनिप्रदूषण प्रकरण

दैनिक गोमन्तक डिजिटल

हणजूण येथील सनबर्न महोत्सवाबाबत एकूणच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका काय होती, यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या वकिलांनी दिली होती.

आदेशात ध्वनिमर्यादा नमूद केली असताना व ही मर्यादा उलटून गेली तरी कारवाई करणारी सरकारी यंत्रणा का कारवाई केली नाही, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. या प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांना खंडपीठाकडून चपराक बसण्याची शक्यता आहे.

‘स्पेसबाऊंड वेबलॅब्स प्रा. लि.’ या कंपनीने सनबर्न महोत्सवाचे आयोजन केले होते. ओझरान, वागातोर - हणजूण येथे २८ ते ३० डिसेंबर २०२२ या काळात साऊंड सिस्टीमच्या परवानगीसाठी २७ डिसेंबर २०२२ रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता.

या आयोजनासाठी हणजूण पंचायतीकडून २६ डिसेंबर २०२२ रोजी तर पर्यटन खात्याकडून १६ डिसेंबर २०२२ रोजी परवानगी घेतली होती. उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांनी २७ डिसेंबर २०२२ रोजी परवानगी दिली होती.

उपजिल्हाधिकारी कार्यालयातून आयोजकांना परवानगी देताना, महोत्सवाच्या ठिकाणी ३ दिवस तेथे ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी यंत्रसामग्रीसह एक पथक तैनात करण्याची लेखी सूचना राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांना केली होती, अशी माहिती सादर केली आहे.

दरम्यान, जनहित याचिकेवरील मागील सुनावणीवेळी सनबर्न महोत्सवावेळी झालेल्या ध्वनिप्रदूषण उल्लंघनप्रकरणी कारवाईसंदर्भातील ठोस माहिती दिली नव्हती. या ध्वनिप्रदूषणाला कोण अधिकारी जबाबदार आहेत व त्यांच्याविरुद्ध काय कारवाई केली, याचा उल्लेख नसल्याने या अहवालाबाबत उच्च न्यायालयाने असमाधान व्यक्त करून सविस्तर माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahu Gochar 2026: अडकलेली कामे मार्गी लागणार! 'या' 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राहू ग्रहाची 'युवावस्था' पालटणार नशीब

Shikhar Dhawan: बांगलादेशातील हिंदू महिलेवरील अत्याचारावर संतापला 'गब्बर'; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, "अशी हिंसा सहन केली जाणार नाही!"

"प्लीज, कोणालाही सांगू नका!", डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाची जाहीर खिल्ली; औषधांच्या किमतीवरुन दिला होता दम

Horoscope: बुद्धी आणि चातुर्याचा विजय! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Spot Fixing Scandal: क्रिकेट विश्वाला हादरवणारी 'अंडरकव्हर' स्टोरी! स्टॉपवॉच अन् रेकॉर्डिंगनं कसं उद्ध्वस्त केलं खेळाडूंचं करिअर? आकाश चोप्राचा व्हायरल VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT