Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गांजा बाळगल्याप्रकरणी ओडिशातील तरुणाला अटक; कोलवा पोलिसांची कारवाई

Colva Police: कोलवा पोलिसांनी बेताळभाटी येथून ओडिशातील तरुणाला 895 ग्रॅम गांजासह अटक केली. सुमित मोहन दास असे या तरुणाचे नाव आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी ड्रग्जविरोधात धडक मोहीम राबवली आहे. विविध ठिकाणाहूंन ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणावर मुद्देमाल जप्त केला जात आहे. याच पाश्वभूमीवर कोलवा पोलिसांनी बेताळभाटी येथून ओडिशातील तरुणाला 895 ग्रॅम गांजासह अटक केली. सुमित मोहन दास असे या तरुणाचे नाव आहे. दासकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची 89, 500 रुपये एवढी आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी डायसवाडा-नागोवा येथे हणजूण पोलिसांनी ड्रग्स तस्करीअंतर्गत छापा टाकून 8.17 लाखांचा 8.175 किलोग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी संशयित संजीब हपाना मारंदी (26) व दीपिका धोबुनी पोलाई (18) या ओडिशातील दोघांना अटक करण्यात आली होती.

डायसवाडा येथील चॅपेलजवळ ड्रग्सचा विक्रीव्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. संशयित घटनास्थळी येताच त्यांना पोलिसांनी पकडले. झडतीवेळी संशयित संजीब मारंदी याच्याजवळ 4.107 किलोग्रॅम तर संशयित दीपिका पोलाई हिच्याकडे 4.068 किलोग्रॅम गांजा सापडला. या गांजाची किंमत 8 लाख 17 हजार 500 रुपये आहे. संशयितांकडून हा गाजा जप्त करुन त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांन्वये गुन्हा नोंद केला व त्यांना अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT