Od' Best Short Film Dainik Gomantak
गोवा

Film Festival Goa : ‘ओड’ सर्वोत्तम लघुपट; चोरीला गेलेल्या किनाऱ्याची गोष्ट

Film Festival Goa : 75 क्रिएटिव्ह माइंड्स उपक्रमांतर्गत निर्मिती

गोमन्तक डिजिटल टीम

Film Festival Goa : पणजी, गोव्यात दिवसेंदिवस आक्रसत चाललेल्या समुद्रकिनाऱ्याबाबत विचार करायला लावणाऱ्या आणि मनाची पकड घेणाऱ्या ‘ओड’ या लघुपटाने, ५४ इफ्फीमध्ये ‘७५ क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ उपक्रमात सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार पटकावला आहे.

विजेत्यांचे अभिनंदन करताना, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सह सचिव (चित्रपट) आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार यांनी चित्रपट निर्मितीमध्ये खऱ्या आशयाची ओळख करून देण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. यामुळे भारताला जागतिक स्तरावर लौकिक वाढेल, असे त्यांनी सांगितले.

देशभरातील तरुण सर्जनशील व्यक्तींसाठी ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’, हे उत्तम व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले.

या लघुपट स्पर्धेतील परीक्षक दिग्दर्शक शूजित सरकार म्हणाले, ‘द मिशन लाईफ’ या संकल्पनेवर ४८ तासांत लघुपट तयार करणे, आत्मपरीक्षण, आशा, निषेध अशा सर्व भावनांचा अनुभव हा महत्त्वाचा आहे.

सर्व लघुपट खरोखरच समर्पक, विचार करायला लावणारे आणि पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन या अत्यंत महत्त्वाच्या विषयाशी संबंधित होते. खरे तर, तुम्ही सर्वच जण विजेते आहात, असे त्यांनी ७५ युवकांना उद्देशून म्हटले.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग सिंग ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम उदयाला आला आहे. फिल्म चॅलेंजचा एक भाग म्हणून, ''क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो'' सहभागींना पाच संघांमध्ये विभागण्यात आले होते.

त्यांनी ४८ तासात ‘मिशन लाइफ’ या संकल्पनेवर लघुपट तयार केले. शॉर्ट्स इंटरनॅशनलच्या सहकार्याने एनएफडीसीने या स्पर्धेची संकल्पना राबवली. स्पर्धेतील सहभागींनी नामवंतांच्या मास्टरक्लासनाही हजेरी लावली.

वाढती बांधकामे; किनाऱ्यांवर संक्रात !

''ओड'' मध्ये मच्छीमार समुदायातील मार्सलीन, आपली बोट ठेवण्यासाठी पार्किंगची जागा शोधण्याच्या प्रयत्नात बोट शहराच्या मध्यभागी घेऊन जातो.

समुद्रकिनारा चोरीला गेला आहे आणि त्याच्याकडे पार्क करण्यासाठी जागा शिल्लक नाही, अशी तक्रार तो करतो. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ आणि समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाल्यामुळे गोव्याचा आक्रसता समुद्रकिनारा, या समस्येवर हा लघुपट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

"7000 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह!", कर्नाटकातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये अलर्ट; दोन वर्षात बाधितांचा आकडा 66 हजारांच्या पार

Goa Monsoon Rainfall 50 Inches: गोव्यात तब्बल 58 दिवसांनंतर पावसाच्या इंचाचे अर्धशतक; गतवर्षीच्या तुलनेत यंदा 16 दिवस अधिक, 31 जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा

Goa Russian Woman Visa Case: आईला हद्दपार करण्यापूर्वी मुलींच्या अश्रूंचाही विचार करा! मुंबई हायकोर्टाकडून केंद्राला मानवतावादी दृष्टिकोनाचे निर्देश

Commonwealth Games 2026: सैन्यात भरती होण्यासाठी धावायचा, आज बनला देशाचा हिरो! गुलवीर सिंहने रचला इतिहास; 10,000 मीटर शर्यतीत जिंकलं 'सिल्व्हर' पदक

SCROLL FOR NEXT