Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa University: गोवा विद्यापीठात अश्लील 'फॅशन शो', विद्यार्थ्यांची अंडरवेअरमध्ये परेड; मानवाधिकार आयोगाची विद्यापीठाला नोटीस

Goa University Controversy: विद्यापीठाच्या शिस्तपालन समितीने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आणि प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरु करण्यात आलीय.

Pramod Yadav

पणजी: गोवा विद्यापीठातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या फॅशन शोमध्ये विद्यार्थ्यांनी (मुले) चक्क अंडरवेअरमध्ये परेड केल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरु असताना आता गोवा मानवाधिकार आयोगाने देखील याची दखल घेतली असून, आयोगाने विद्यापीठाला नोटीस बजावली आहे.

गोवा विद्यापीठात चार महिन्यांपूर्वी ‘फ्रॉलिक’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एका सेगमेंट अंतर्गत चक्क अंडरवेअरमध्ये वॉक केला. विद्यापीठाच्या शिस्तपालन समितीने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आणि प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरु करण्यात आली. 

विद्यापीठाच्या शिस्तपालन समितीचा अहवाल येत्या सोमवारपर्यंत कार्यकारी मंडळासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता या प्रकरणाची गोवा मानवाधिकार आयोगाने देखील गंभीर दखल घेतली असून, विद्यापीठाला थेट नोटीस पाठवली आहे. कुलुगुरुंना याप्रकरणी येत्या २३ जुलैपर्यंत आयोगासमोर सविस्तर अहवाल सादर करावा लागणार आहे.

चार महिन्यांपूर्वी विद्यापीठात फ्रॉलिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घडलेल्या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी आक्षेप व्यक्त केला होता. दरम्यान, आता आयोगाने देखील याची दखल घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT