GSIA Dainik Gomantak
गोवा

विवेक मराठे यांच्या वक्तव्यावर आक्षेप, नाराजी

मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांसह केंद्राला दिले निवेदन

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील 70 टक्के उद्योग हे कारखाने व बाष्पक संचालनालयाचे सुरक्षा व नियम पाळत नसल्याच्या संचालक विवेक मराठे यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिलेल्या मुलाखतीतील प्रतिक्रियेला गोवा राज्य उद्योग संघटनेने (जीएसआयए) आक्षेप घेऊन नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी हे विधान झुआरी कंपनीत झालेल्या दुर्घटनेनंतर सर्वसाधारणपणे केला आहे. उद्योजक सुरक्षा व नियम याचे पालन करतात मात्र एखाद्याने त्याचे उल्लंघन केल्यास मुळे सर्वांनाच गृहित धरणे उचित नाही, असे स्पष्टीकरण केले आहे.

‘जीएसआयए’ने संचालक विवेक मराठे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करणारे निवेदन आज मुख्यमंत्री, उद्योगमंत्री व केंद्र सरकारला पाठवल्या आहेत. झुआरी ॲग्रो कंपनीत झालेल्या प्रकल्पातील अपघात दुर्दैवी असून त्यात तीन कामगारांचा मृत्यू झाला. हा प्रकल्प वार्षिक देखभालीसाठी बंद करण्यात आला होता व काम सुरू होते. कंडेन्सेट टाकीवर हे काम सुरू होते. कंत्राटदार नेहमी कामगारांची सुरक्षा व नियमांचे पालन करूनच काम करत अशतो. सर्व खबरदारी व सुरक्षेचे निकष असूनही काहीवेळा अपघात घडतात हे सामान्य ज्ञान आहे. काहीवेळा कंपनीकडून त्रुटी राहिल्यास नियमांनुसार कारवाई करायला हवी व ती कृती संघटनेलाही मान्य आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे बहुतेक उद्योजक नियमांचे पालन करत नाही असे विधान करणे योग्य नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT