Stray Cattle Dainik Gomantak
गोवा

Goa Stray Cattles: मोकाट गुरांमुळे उसगावात वाढले अपघातांचे प्रमाण!

Goa Usgaon: प्रशासकीय यंत्रणेने त्वरित तोडगा काढावा अशी जोरदार मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

मोकाट गुरांच्या उच्छादामुळे सध्या उसगाव ते खांडेपार आणि कुर्टी भागातील मुख्य रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी पार येथे गुराला धडकल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता.

ही गुरे रात्रभर रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालकांना पावसामुळे ती दिसत नसल्याने अपघातांचे सत्र सध्या सुरू झाले असून संबंधित प्रशासकीय यंत्रणेने त्वरित यावर तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

उसगाव - म्हारवासडा ते खांडेपार व पुढे कुर्टीपर्यंतच्या रस्त्यावर कायम गुरांचा कळप बसलेला असतो. या गुरांमुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच; पण गुरांना धडकून विशेषतः दुचाकीस्वारांना अपघात होत आहेत. यातील काही अपघात जीवघेणे ठरले असून गुरांचा बंदोबस्त करणे ही काळाची गरज बनली आहे.

म्हारवासडा - उसगाव भागात तर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गुरांची वर्दळ सुरू असते. रस्त्याने जाताना ही गुरे दुचाकीस्वारांच्या मागे धावण्याचेही प्रकार घडत आहेत. त्यामुळे ही गंभीर बाब लक्षात घेऊन या गुरांचा त्वरित बंदोबस्त करण्याची आवश्‍यकता आहे. फोंडा पालिकेने बेतोडा - निरंकाल येथे गोशाळा उभारली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT