covid 19 goa 2.jpg 
गोवा

COVID-19 Goa: दिलासादायक; कोरोना रूग्णसंख्या होतेय कमी; चोवीस तासांत 327 नवे रुग्ण

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात कोरोनाच्या चाचण्यात वाढ होत आहे. तर दुसरीकडे, नव्या रुग्णांची संख्याही कमी होताना दिसून येत आहे. ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे. सोमवारी केवळ 1695 चाचण्या करण्यात आल्या होत्या. मंगळवारी मात्र 3120 चाचण्या झाल्या. (The number of corona patients is decreasing in goa)

त्यातून 327  नवे कोरोनाबाधित सापडले. त्यामुळे राज्यात कोरोना  नियंत्रणात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये 14 हजार 694 चाचण्या करण्यात आल्या. त्यातून 1895 नवे कोरोनाबाधित सापडले. त्याचबरोबर पाच दिवसांत 3269 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 548 कोरोनाबाधित बरे झाले तर 10 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबाधित मृत्यू होणाऱ्यांची संख्या 2947 झालेली आहे.  दहापैकी 5  जणांचा मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे, चौघांचा दक्षिण गोवा जिल्हा  इस्पितळ, मडगाव येथे मृत्यू झाला. दक्षिण गोव्यातील एका खाजगी इस्पितळामध्ये एकाचे निधन झाले.  

5 दिवसांतील चाचण्या : 14694 
 नवे कोरोनाबाधित : 1895 
 बरे झालेले : 3269 
 पाच दिवसांत मृत्यू :  56

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

Bicholim Marigold Farming : डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT