Indian Medical Association Installation Ceremony Dainik Gomantak
गोवा

Goa News: आता तुम्ही घेऊ शकता इच्छा मरण! डॉक्टर अन् गोवा सरकार ठरवणार नियमावली

असे अनेक रुग्ण असतात जे जीवघेण्या आजाराने त्रस्त असतात. जे फक्त वैद्यकीय आधारावर जिवंत असतात. तसेच काहींवर कोणत्याही उपचाराचा कोणताच परिणाम होत नाही. त्यांना आता इच्छामरण स्वीकारता येणार आहे.

Kavya Powar

Indian Medical Association Installation Ceremony

राज्यात मृत्यूशी झुंज देत असलेली व्यक्ती आता आपल्याला कसे मरण पाहिजे याचा निर्णय घेऊ शकते. जगण्याची शक्यता कमी असेल तर कोणत्या प्रकारचे उपचार करायचे किंवा उपचार बंद करायचे, हे आता आपण ठरवू शकतो, असे प्रतिपादन डॉ. संदेश चोडणकर यांनी केले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 2024 च्या समितीच्या स्थापना कार्यक्रमात ते बोलत होते.

आजच्या कार्यक्रमात मानसिक आरोग्यासाठी गोव्याला आदर्श राज्य बनवणे (Goa as a model State for Mental Health) आणि इच्छामरण (End of Life Care) या दोन महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

Dr. Shekhar Salkar

याबाबत अधिक माहिती सांगताना डॉ. शेखर साळकर म्हणाले की, असे अनेक रुग्ण असतात जे जीवघेण्या आजाराने त्रस्त असतात. जे फक्त वैद्यकीय आधारावर जिवंत असतात. तसेच काहींवर कोणत्याही उपचाराचा कोणताच परिणाम होत नाही. त्यांना आता इच्छामरण स्वीकारता येणार आहे.

अशांना उपचार सुरू ठेवायचे का? कोणत्या पद्धतीचे उपचार करायचे? की सुरू असलेले उपचार बंद करायचे आणि मृत्यू स्वीकारायचा हा निर्णय आता घेता येणार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात मंजूरी दिली आहे.

तसेच जर कुणी याबाबत निर्णय घेण्याच्या अवस्थेत नसेल तर ते आपल्या परिवारापैकी एकाची नेमणूक करू शकतात. जे त्यांच्या मृत्यूचा निर्णय घेऊ शकतील.

डॉ. साळकर पुढे म्हणाले की, याबाबत संबंधित डॉक्टर गोवा सरकारची भेट घेऊन नियमावली ठरवणार आहेत. त्यामुळे आता तुम्‍हाला कसा मृत्यू हवा हे ठरवता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT