Goa-Mumbai Vande Bharat Express Dainik Gomantak
गोवा

Vande Bharat : Mumbai -Goa मार्गावरही आता ‘वंदे भारत’ रेल्वे

‘वंदे भारत’ प्रतितास 160 किलोमीटर वेगाने धावते

दैनिक गोमन्तक डिजिटल

Vande Bharat : देशभरात भारतीय रेल्वे विभागातर्फे ‘वंदे भारत’ ही नवी वेगवान रेल्वे सेवा सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार मुंबई ते गोवा मार्गावरही ‘वंदे भारत’ रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज दिली.

महाराष्ट्रातील (कोकण) एका शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची भेट घेतली. सध्याच्या घडीला ‘वंदे भारत’ ही रेल्वे सेवा सर्वांत वेगवान मानली जाते. प्रतितास 160 किलोमीटर या वेगाने ती धावत असल्याने अनेक राज्यांत ही सेवा सुरू झाली आहे.

सध्या कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दर आठवड्याला मुंबई ते गोवा या मार्गावर लाखो रेल्वे प्रवासी प्रवास करतात. ही दोन्ही ठिकाणे प्रवासी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाची असल्याने या मार्गावर ही सेवा सुरू करणे आवश्‍यक असल्याचे या शिष्टमंडळाने मंत्री दानवे यांना सांगितले.

मुंबई ते गोवा रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असल्यामुळे लवकरच ही सेवा सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket Association: सलग पाचवा मोसम की नवा 'पाहुणा' खेळाडू? अर्जुन तेंडुलकरच्या गोव्यातील भवितव्याचा फैसला लवकरच!

मुरगाव, वास्कोत वीज बिलांचा शॉक! वाढीव बिलांमुळे संतप्त नागरिकांनी अभियंत्याला घेतलं फैलावर; विद्युत भवनात राडा

Goa Fraud Case: चार्ल्स शोभराजचा ‘चेला’ अखेर गजाआड! 35 वर्षांत 300 पंचतारांकित हॉटेल्‍सना गंडा; गोव्यातही राहून गेला महाठग

अरब व्यापाऱ्यांनी भारतात आणले आणि इथेच स्थिरावले, 'गोरखचिंचे'च्या प्रवासाची रंजक कहाणी

Goa Kala Academy: कला अकादमी, 'क्या पाया क्या खोया?'

SCROLL FOR NEXT