Goa Assembly Session 2024| Yuri Alemao And Cm Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: आता रामराज्य आलंय! CM सावंत युरी आलेमावना म्हणाले 'भिवपाची गरज ना'

Goa Assembly Session 2024: राज्यपालांच्या अभिभाषणावर उर्वरीत सदस्यांनी भाष्य केल्यानंतर त्याला मुख्यमंत्री सावंत उत्तर देत असताना त्यांनी हे वक्तव्य केले.

Pramod Yadav

Goa Assembly Session 2024: देशात आता रामराज्य आले असून, अयोध्येत रामलल्लाची स्थापना झाली आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना सभागृहात दिले.

राज्यपालांच्या अभिभाषणावर उर्वरीत सदस्यांनी भाष्य केल्यानंतर त्याला मुख्यमंत्री सावंत उत्तर देत असताना त्यांनी हे वक्तव्य केले.

मुख्यमंत्री उत्तर देत असताना आलेमाव यांनी मध्येच प्रश्न उपस्थित केल्याने, "तुम्ही बोलत असताना मी शांतपणे ऐकत होतो, मी बाहेर गेलो तरी माझं लक्ष तुमच्याच बोलण्याकडे होते. तुम्ही विरोधी पक्षनेते असल्याने तुमचे ऐकावंच लागेल, नाही ऐकलं तर उद्या तुमच्या प्रश्नांना उत्तर दिले नाही असे होईल," असे प्रमोद सावंत म्हणाले.

"आणि आता रामराज्य स्थापन झाले आहे. रामलल्लाची स्थापना झाली असून खऱ्या अर्थानं रामराज्य प्रास्थापित झाले आहे, त्यामुळे तुम्हालाही घाबरण्याची गरज नाही," असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

तसेच, आमच्या सरकारच्या काळात आम्ही जी गॅरंटी देतो ती पूर्ण करतोच कारण ती मोदींची गॅरंटी आहे, असेही सावंत यावेळी म्हणाले. मागील दहा वर्षातील इतिहास पाहता तुमच्या लक्षात येईल, असेही सावंत यांनी सांगितले.

राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजना लोकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अलिकडेच कुंक्कळीत उद्घाटन झालेल्या एनआयटी सारख्या संस्थांचा फायदा गोव्यातील विद्यार्थ्यांना होईल.

तसेच, येथे निर्माण होणाऱ्या रोजगार संधी कुंक्कळीकरांना दिली जाईल, असेही आश्वासन सावंत यांनी यावेळी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT