Jit Arolkar Dainik Gomantak
गोवा

आता फक्त जनहिताचे समाजकारण : जीत आरोलकर

पार्सेत जाणून घेतल्या ग्रामस्थांच्या समस्या

दैनिक गोमन्तक

मोरजी : मांद्रे मतदार संघातील जनतेने आपल्यावर जो विश्वास ठेवून आपल्याला आमदारकी दिलेली आहे. निवडणुकीपूर्वी आपण जी जी आश्वासने जनतेला दिलेली आहेत. ती पूर्ण करणार असल्याचे सांगून आता राजकारण बाजूला ठेवून आम्ही समाजकारण करूया,असे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले. आपल्याकडे आलेल्या व्यक्तीच्या समस्या सोडवणार शिवाय आपण कधीच तो अमुक पक्षाचा तो तमुक पक्षाचा हे पाहणार नाही.

आपल्याला केवळ समाजकारण करायचे आहे. पाच वर्षानंतर राजकारण पुन्हा करू,असही ते म्हणाले. पार्से पंचायत सभागृहात शुक्रवारी आयोजित ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी सरपंच प्रगती सोपटे, उपसरपंच अजित मोरजकर, पंच परेश गवंडी, पंच पार्सेकर, रवी महालदार, लक्ष्मीकांत गवंडी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

आरोलकर यांनी सुरुवातीला पंचायत मंडळाच्या समस्या जाणून घेतल्या. विविध विकास कामांचे ठराव तसेच मंजूर होऊन सरकार दरबारी रखडलेली कामे यांचीही माहिती जाणून घेतली. पंच सदस्य सरपंच यांनीही आपापल्या प्रभागातील कामांची यादी आमदार जीत आरोलकर यांना सादर केली.

प्रत्येक पंचायतीत आठवड्यात अर्धा दिवस

पंचायत मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. पंचायत क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या किंवा त्यांचे लहान लहान कामे पंचायती मार्फत कशा पद्धतीने सोडवली जातील. या विषयी आपण आपल्या कर्मचाऱ्यांसहित दर आठवड्याला अर्धा दिवस प्रत्येक पंचायत क्षेत्रात लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपलब्ध राहू,अशी ग्वाही आमदार जीत आरोलकर यांनी यावेळी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT