Entertainment Dainik Gomantak
गोवा

Entertainment: महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला अजून एक झटका, आता मनोरंजन देखील महागणार!

राज्यातील केबल ऑपरेटरनी राष्ट्रीय चॅनेलच्या सेवा बेमुदत खंडित केल्या

गोमन्तक डिजिटल टीम

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे आधीच महागाई वाढल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सोबत खाद्य तेल सुद्धा प्रचंड महाग झाले आहे. महागाईमुळे मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य जनतेला आता आणखी एक झटका बसणार आहे.

घरात निवांत बसून टीव्ही पाहणे देखील आता महागणार आहे. टीव्ही पाहण्यासाठी आता चॅनेल्ससाठी जास्त खर्च करावा लागणार आहे.

राष्ट्रीय चॅनेलमध्ये दरवाढ केली असल्याने त्याचा फटका राज्यातील सर्व केबल ऑपरेटर्सना बसला आहे. परिणामी टीव्ही चॅनेलच्या दरवाढी विरोधात राज्यातील सर्व केबल ऑपरेटर्सनी अनेक राष्ट्रीय चॅनेलच्या सेवा बेमुदत खंडित केल्या आहेत.

या वाढीव दराबाबतचे नियम आणि अटी याबद्दल अद्याप सविस्तर माहिती समजू शकली नाहीय. मात्र ग्राहकांना या दरवाढीचा फटका बसणार असल्याचा दावा केबल ऑपरेटर्सनी केलाय. थोडक्यात महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला आता मनोरंजन देखील महागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT