Peoples oppose mobile tower Dainik Gomantak
गोवा

Calangute News : हडफडेत मोबाईल टॉवरवरून आमदार-सरपंच आमनेसामने

लोबोंना हवे टॉवर : नागरिकांचा तीव्र विरोध

दैनिक गोमन्तक डिजिटल

नागवा - हडफडे येथील वीज उपकेंद्राच्या आवारात नवीन मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रयत्न स्थानिकांनी मंगळवारी हाणून पाडला. दरम्यान, स्थानिक पंचायत मंडळाकडून याआधीच मोबाईल टॉवरच्या बांधकामास विरोध करणारा ठराव मंजूर करून घेण्यात आल्याने कळंगुटचे आमदार मायकल लोबो तसेच हडफडेचे सरपंच रोशन रेडकर या प्रकरणावरून एकमेकांच्या आमनेसामने आले.

सध्याच्या शैक्षणिक पद्धतीनुसार विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट नेटवर्क सुरळीत राहणे आवश्यक असून त्यासाठी गावोगावी मोबाईल टॉवर उभारणे काळाची गरज असल्याचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले, तर स्थानिकांनी मोबाईल टॉवरला विरोध केल्यामुळे सरपंच रोशन रेडकर यांनी विरोध केला. त्यामुळे आमदार आणि पंच यांच्यातील वाद पुढे आला आहे.

स्थानिकांनी पंचायत कार्यालयात मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावून मोबाईल टॉवरला जोरदार विरोध केला. त्यामुळे स्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनाही यावेळी हस्तक्षेप करावा लागला.

लोबो म्हणाले...

लोकांनी शैक्षणिक माध्यम आणि काळाची गरज ओळखून मोबाईल टॉवरला विरोधासाठी विरोध करण्याऐवजी याबाबतीत अधिक जाणून घ्यावे. यासाठी सरकारकडूनही जनजागृती मोहीम हाती घेणे आवश्यक आहे.

सरपंचांचे म्हणणे...

गावागावांतील प्रभाग क्षेत्रांचा विचार केल्यास सुरळीत कनेक्टिविटीसाठी परिसरातील इमारतींवर मोबाईल टॉवरऐवजी छोटे बुस्टर बसवूनसुद्धा विद्यार्थ्यांची सोय होऊ शकते, अशी बाजू यावेळी सरपंचांनी मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

SCROLL FOR NEXT