Pramod Sawant Dainik Goamantak
गोवा

Pramod Sawant: तर गोव्यात एकही पर्यटक येणार नाही, मुख्यमंत्री सावंत यांचा सूचक इशारा

पणजी येथे आज कचरा व्यवस्थापनावर स्टेकहोल्डर एंगेजमेंट कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले

Pramod Yadav

गोव्यात उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण असेच सुरू राहिल्यास पुढील दहा वर्षात एकही पर्यटक गोव्यात येणार नाही. असा सूचक इशारा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दिला आहे. पणजी येथे आज कचरा व्यवस्थापनावर स्टेकहोल्डर एंगेजमेंट कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरचे (BARC) शास्त्रज्ञ डॉ. शरद काळे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होते.

"गोव्यातील साळगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठा कचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. राज्यात सर्व प्रकारचा कचरा व्यवस्थापन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ई-वेस्ट, बांधकाम संबधित कचरा आणि बायो-मेडिकल (वैद्यकीय कचरा) याचे देखील व्यवस्थापन केले जाते. कचरा व्यवस्थापनावरील वर्कशॉप पंचायत सदस्य, सरपंच आणि इतर सभासदांना विविध माहिती मिळण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. गोव्याला स्वच्छ ठेवण्याची आणि त्याची ओळख जपण्याची आपली जबाबदारी आहे. राज्यातील पर्यटन वाढीसाठी आणि जनजीवन सुरळीत करण्यासाठी हे महत्वाचे आहे." असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

स्वत:च्या सोईसाठी गोव्यातील रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका. आणि उघड्यावर कचरा टाकून देणे सुरूच राहिल्यास त्याचा तोटा गावांना देखील होईल. आरोग्य देखील धोक्यात येऊ शकते. गोव्याला स्वच्छ ठेवण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT