Goa Saras 2022 Exhibition  Dainik Gomantak
गोवा

Goa Saras 2022: 'गोवा सरस'ला ग्राहकांचा उकृष्ट प्रतिसाद

Goa Saras 2022: गोवा सरस प्रदर्शन 20 डिसेंबर पासून सुरु झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Saras 2022: ग्रामीण व्यावसायिकांना व्यासपीठ मिळवून द्यावे, या उद्देशाने दरवर्षी गोवा सरस उपक्रम राबविला जातो. 20 डिसेंबर पासून सुरू झालेल्या या सरस प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभत असून येथे प्रदर्शनाला येणाऱ्या नागरिकांना खरेदीबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचाही आस्वाद घेता येत असल्याने दुहेरी लाभ होत आहे.

कांपाल मैदानावर भरलेल्या या प्रदर्शनाला पणजीतील तसेच राज्यातील अनेक नागरिक आवर्जून भेट देत असून खरेदीही मोठ्या प्रमाणात करत असल्याने ग्रामीण स्वयंसहाय्य गटांना याचा आर्थिक लाभ देखील होत आहे.

प्रदर्शनात गोमंतकीय व्यावसायिकांचे स्टॉल अधिक आहेत. यापैकी बहुतांशी स्टॉल्स हे स्वयंसहाय्य गटांचे आहेत. गोमंतकीय खाद्यपदार्थ, प्रामुख्याने गोड पदार्थ ज्यात चकली, खोबऱ्याची वडी, लाडू आदींसहित उकडे तांदूळ, उळू माडी याशिवाय बांबूपासून बनविलेल्या पारंपरिक कलाकृतीही उपलब्ध आहेत.

संध्याकाळी वाढते गर्दी

गोवा सरस प्रदर्शनाला दिवसभर अल्प प्रतिसाद असतो. मात्र, संध्याकाळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची रेलचेल वाढू लागते. कारण, संध्याकाळी सरस प्रदर्शनाच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याने प्रदर्शनात खरेदीही होते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद देखील लुटता येतो. त्यामुळे ग्राहकांची गर्दी संध्याकाळी दिसते.

गीता मांद्रेकर, सिद्धिविनायक स्वयंसाहाय्य गट-

2006 पासून आपण गोवा सरस महोत्सवात सहभागी होत आहे. यंदाही ‘सरस’ला चांगला प्रतिसाद लाभत आहे. अनेक ग्राहक माझ्याकडून गोमंतकीय खाद्यपदार्थ, उकडे तांदूळ आदी साहित्य खरेदी करतात. अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT