Bicholim DainikGomantak
गोवा

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाण्याने भरलेल्या खाणींची पाहणी

पावसाळ्यात खाणी पासून कोणतेही संकट ओढवू नये - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

दैनिक गोमन्तक

पणजी : पावसाळ्यात खंदकापासून कोणतीही आपत्ती ओढवू नये. यासाठी प्रशासकीय पातळीवरुन हालचाली गतिमान झाल्या आहेत. खाणींची पाहणी करून त्वरित अहवाल सादर करण्याचे खुद्द मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आदेश देताच, प्रशासकीय यंत्रणा सतर्क होवून कामाला लागली आहे. आज शुक्रवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी मामू हागे यांनी डिचोलीतील विविध खाणींची पाहणी केली.

डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक खाणींची पाहणी करताना संबंधित खाण कंपनींचे अधिकारी उपस्थित होते. येत्या दोन पाहणीचा अहवाल तयार होणार असून, त्यानंतरच खाणींच्या सुरक्षेच्या उपाययोजनांना गती मिळण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील डिचोलीत खाणक्षेत्र आहेत. एकाबाजूने मोसमी पावसाळा सुरु होतो आहे. तर दुसऱ्याबाजूने तुडुंब भरलेली खाणी खाली करण्यास झालेली दिरंगाई यामुळे डिचोलीतील खाणक्षेत्र भागात भयावह स्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी डिचोलीसह अनेक भागात घडलेल्या घटनांमुळे भीती वाढली आहे. धोकादायक खाणी त्वरित खाली करावीत. तसेच सुरक्षेच्यादृष्टीने खाणींवर प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात. या मागणीने आता जोर धरला आहे.

''पावसाळ्यात खंदकांपासून कोणतेही संकट ओढवू नये''

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आदेशानंतर खाणींवरील सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजनांचा आढावा घेतला गेला होता. पावसाळ्यात खाणींपासून कोणतेही संकट ओढवू नये. यासाठी उपाययोजना करणे, खाणपिटांची नियमित तपासणी करणे आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना केल्या.

संबंधीत खाण कंपन्यांनी सहकार्य करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यावेळी खंदकाच्या सुरक्षेबाबतीत प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरु झाल्याने खाणव्याप्त भागातील जनतेला काहीसा धीर मिळाला आहे. पावसाळा जवळ आल्याने तातडीने उपाययोजना मार्गी लावाव्यात अशी खाणव्याप्त भागातील जनतेची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT