CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : माझा एकही मंत्री जमीन हडप प्रकरणांमध्‍ये सहभागी नाही

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचं काँग्रेस नेते गिरीश चोडणकरांना चोख प्रत्युत्तर

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant : गेल्‍या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर हे ‘ राज्‍य सरकारमधील एक मंत्री जमीन हडप प्रकरणात आहे. त्‍याला डच्‍चू द्या’, अशी सातत्‍याने मागणी करत आहेत. त्‍यावर मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी स्‍पष्‍टीकरण दिले आहे. ‘माझा एकही मंत्री जमीन हडप प्रकरणांमध्‍ये सहभागी नाही. गिरीश चोडणकर यांनी आरोपबाजी करण्‍यापेक्षा आपल्‍याकडील पुरावे ‘एसआयटी’कडे सादर करावेत’, असे आव्‍हान त्‍यांनी दिले आहे.

जमीन हडप प्रकरणी ‘एसआयटी’कडून नवी प्रकरणे समोर आणली जात आहेत. मात्र, आतापर्यंत ज्‍यांना पकडण्‍यात आले, त्‍यांना जामीन मिळाला असल्‍याने या कारवाईबाबत नाराजीही व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. काँग्रेस नेत्‍यांनी जमीन हडप प्रकरणात एक मंत्रीही आहे, असे आरोप केले आहेत. त्‍यावर मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी वरील खुलासा करत चोडणकर यांना आव्‍हान दिले आहे.

काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी जमीन हडप प्रकरणात भाजपच्या एका कॅबिनेट मंत्र्याचा समावेश असल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना चोडणकर यांनी याप्रकरणात दोषी असलेल्या मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी थेट आव्हानच दिलं होतं.

पर्वरी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी 20 जुलै 2022 रोजी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. ज्यात पॉवर ऑफ अॅटर्नीचा वापर करत जमीन घोटाळा झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. याच प्रकरणात दक्षता खाते तसंच पंचायत संचलनालयाकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र ना पोलीस ना एसआयटी कुणीही याप्रकरणी तपास न केल्याचा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे. आता विशेष तपास पथकाकडेही या प्रकरणात तक्रार दाखल केल्याचं चोडणकर यांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

SCROLL FOR NEXT