Noise pollution Dainik Gomantak
गोवा

Noise pollution: आवाज नको वाढवू डीजे! गोव्यातील संगीत पार्ट्यांवर GSPCB चे लक्ष

ध्वनी प्रदूषण ही निसर्गनिर्मित समस्या नसून मानवनिर्मित आहे आणि त्यामुळे ती नियंत्रित करणे आवश्यक आहे

दैनिक गोमन्तक डिजिटल

वाढते शहरीकरण, औद्योगिकरण, वाहनांची वाढलेली संख्या आणि बेसुमार लोकसंख्या वाढ यामुळे पर्यावरणाचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ध्वनी प्रदूषण हा त्यातीलच एक भाग. या प्रदूषणाचे विपरीत परिणाम सध्या सर्वांना भोगावे लागत आहेत. सध्या गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी वेगवेगळ्या पार्ट्या आयोजित केल्या जात आहेत. कानठळ्या बसवणाऱ्या या संगीत पार्ट्यांमुळे ध्वनी प्रदूषणाची समस्या सध्या उद्भवत आहे. या संबंधी बोलताना गोवा प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी या गोष्टीला आवर घालणं गरजेचं असल्याचे म्हटले आहे.

पाटील म्हणाले ध्वनी प्रदूषण ही निसर्गनिर्मित समस्या नसून मानवनिर्मित आहे आणि त्यामुळे ती नियंत्रित करणे आवश्यक आहे. मी गोवा प्रदूषण मंडळाचा अध्यक्ष असल्याने आम्हाला पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत काही उपाययोजना करणे बंधनकारक आहे, आवश्यक परवानगीशिवाय मोठ्या आवाजातील पार्ट्या आणि संगीत आणि ध्वनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना, प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपजिल्हाधिकारी, पोलीस आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी आवर घालण्याची गरज आहे.

गोव्यातील अंजुना-वागादोर परिसरातील काही हॉटेल्समध्ये मोठ्या आवाजात गाणी- संगीत लावून उपद्रव केल्याच्या जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. या भागात संध्याकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (EDMS) इव्हेंट, पार्ट्या सुरु असतात अशा याचिकांमुळे ध्वनी प्रदूषणाच्या या समस्येवर कायदेशीर कारवाईची गरज निर्माण झाली आहे. या सगळ्याला आला घालण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशांचे पालन करून सरकारने एक कृती आराखडा तयार केला आहे येथे कार्यरत असणाऱ्या सर्व एजन्सींच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आम्ही या वाढत्या ध्वनी प्रदूषणाला काही प्रमाणात का होईना रोखू शकू, असे अध्यक्ष महेश पाटील यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फाळणीपूर्वी पाकिस्तानला गेले, 1981 मध्ये पुन्हा गोव्यात आले; 44 वर्षाच्या संघर्षानंतर मिळाले भारतीय नागरिकत्व

Panajim: सहा दिवस उलटले, मांडवीत बुडालेली बोट काढण्यासाठी अजूनही हालचाली नाही

New IPO: 200 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट; गोव्यातील 'मोलबायो डायगनोस्टीक' कंपनीचा लवकरच येणार आयपीओ

Goa Politics: प्रचंड बहुमत असूनही नाराजीचा सूर वाढतोय, 2027ची निवडणूक 'भाजप'साठी ठरणार कठीण कसोटी

रविंच्या 'फ्री हँड' फॉर्म्युल्यामुळे गुन्हेगार थरथर कापत होते; आज मात्र कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT