No-confidence motion against Poinguinim Panchayat Sarpanch Jagdish Gavkar Dainik Gomantak
गोवा

पैगीण पंचायतीचे सरपंच जगदीश गावकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव समंत

ही बैठक काणकोणचे गटविकास अधिकारी अनिल नाईक यांच्या निरिक्षक पदाखाली झाली.

दैनिक गोमन्तक

काणकोण: पैगीण पंचायतीचे सरपंच जगदीश गावकर यांच्या विरोधात पांच पंचानी दाखल केलेला अविश्वास ठराव सरपंचासह अन्य चार पंच बैठकीला अनुपस्थित राहिल्याने पांच विरूद्ध शुन्य मतानी समंत झाला.ही बैठक काणकोणचे गटविकास अधिकारी अनिल नाईक यांच्या निरिक्षक पदाखाली झाली.

पंचायत मंडळाचा कार्यकाल संपण्या उणेपूरे दोन महिने असताना विधानसभा निवडणुकी नंतर राज्यात विद्यमान सरपंचा विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता .सरपंचावरील अविश्वास ठराव समंत झाल्याने सरपंच पदाचा ताबा उपसरपंच एल्डा फर्नांडीस यांच्याकडे देण्यात आला आहे.

पैगीणचे सरपंच जगदीश गावकर याच्यावर नऊ पैकी पांच पंचाचा अविश्वास ठराव दाखल केला होता.त्या ठरावर चर्चा करण्यासाठी आज (ता.1) सकाळी 11 वाजता पंचायत मंडळाची खास बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीला अविश्वासवाच्या नोटीसीवर सह्या केलेले महालवाडेचे पंच रामदास पुजारी,वेलवाडा वार्डाच्या पंच सरिता पागी,अर्धफोंड येथील एल्डा फर्नाडीस,गाळयेचे पंच प्रवीर भंडारी,व तळपणचे पंच रूद्रेश नमशीकर उपस्थित होते. नवीन सरपंचाच्या निवडीसाठी पंचायत संचालकांनी तारीख दिल्यास रूद्रेश नमशीकर यांची वर्णी सरपंचपदी लागणार असल्याचे पंच प्रवीर भंडारी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

SCROLL FOR NEXT