No water supply in Gandhinagar area  Dainik Gomantak
गोवा

गांधीनगरवासीयांची पाण्यासाठी वणवण

धरणाजवळ असलेल्या सावर्डे मतदारसंघातील गांधीनगरला मात्र पाण्याची समस्या

दैनिक गोमन्तक

सासष्टी: सावर्डे मतदारसंघातील गांधीनगर परिसरात नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने या परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून ओहोळवर जाऊन पाणी आणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. गांधीनगरवासीयांना भेडसावणारी ही समस्या दूर करून लवकरात लवकर सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सरकारने 24 तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे, पण सावर्डे मतदारसंघातील गांधीनगर गावात दिवसाला दोन तासही पाणी मिळत नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत त्रुटी आल्याने पाणीपुरवठा होत नसल्याचे संबंधित खात्याकडून सांगण्यात येत असून यंत्रणेत बिघाड होणे हे रोजचेच झाले आहे. सांगेतील धरणाचे पाणी हे विविध भागात पोचते, पण या धरणाजवळ असलेल्या सावर्डे मतदारसंघाला गांधीनगरला मात्र पाण्याची समस्या भेडसावत आहे. सुरळीत पाणीपुरवठा आश्वासन देण्यात आलेले असले, तरी अद्याप या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही, असे स्थानिकांनी सांगितले.

सावर्डे मतदारसंघात जायकाच्या जलवाहिन्या घालण्यात आलेल्या आहेत, पण या जलवाहिन्यांतून अजून पाणी आलेले नाही. गांधीनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत असून सणासुदीला तर पाणीपुरवठा खंडित होणे हा नित्यकर्मच बनला आहे. सरकार आज गोमंतकीयांना मोफत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देत आहे, पण गांधीनगरवासीयांना सुरळीत पाणी पुरवठाच मिळणे कठीण बनले आहे, असे स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

SCROLL FOR NEXT