Shivraj Singh Chouhan Dainik Gomantak
गोवा

Shivraj Singh Chouhan: गोव्यात आलं की परत जावं असं वाटत नाही; मोदी सरकारमधील कृषीमंत्री असं का म्हणाले?

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आपल्याजवळ असलेल्या संसाधनांचा तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या क्षमतेचा वापर करत आपण आपल्या प्रदेशाला कशा प्रकारे समृद्ध करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'स्वयंपूर्ण गोवा' होय. हा उपक्रम येत्या काळात देशाला दिशादर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.

'स्वंयपूर्ण गोवा' अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आभासी पद्धतीने चौहान मार्गदर्शन करत होते. या आभारी मार्गदर्शन कार्यक्रमात राज्यभरातील शेतकरी, स्वयंपूर्ण मित्र, ग्रामपंचायत, नगरपालिका मंडळांचा सहभाग होता. या कार्यक्रमादरम्यान गोव्याच्या 'लखपती दीदी' ठरलेल्या स्नेहा नाईक व राणीया नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सामूहिक पद्धतीने शेती करा

गोव्यात शेतीची स्थिती चांगली आहे. देशात अनेक राज्यांत बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे आता सेंद्रीय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे. खतांच्या अतिवापरामुळे शेतीची सुपीकता नष्ट झाली आहे.

आता एका शेतकऱ्याने शेती करण्यापेक्षा गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती केल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ शेतकऱ्यांना होईल. तसेच महिलांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे, असे मंत्री चौहान म्हणाले.

हरित पर्यटनाला चालना देणे गरजेचे

राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहे. उत्कृष्ट बीज पुरविले जात आहे. गोव्यात खाद्यप्रदूषणाची एकही घटना घडलेली नाही, ही उल्लेखनीय घटना आहे. गोव्याला निसर्गाने भरभरून दिले आहे.

गोव्यात आले की पुन्हा परत जाऊ नये असेच वाटते. पर्यटनाच्या अनुषंगाने हरित पर्यटनाला चालना देण्याचा सरकारचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे, असे चौहान यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

Goa Sports: केंद्रीय जलतरण स्पर्धेत गोव्याची यशस्वी कामगिरी! सक्षम, धिमनला रौप्यपदके

Accident In Goa: दत्तवाडी साखळीत बुलेट आणि चारचाकीचा भीषण अपघात

Devara Part 1: गोव्यातील वॉटर ॲक्शन सीन, गाणी आणि बरचं काही... NTR ने चित्रपटाबाबत केले अनेक खुलासे

SCROLL FOR NEXT