Goa Weather Canva
गोवा

Goa Weather: गोव्यात थंडी गेली कुठे? उष्म्याने नागरिक हैराण; रोगराई पसरण्याची भीती

Goa Weather Update: पाऊस बंद झाल्यानंतर ऐन हिवाळ्याच्या दिवसांत कडक ऊन पडत असल्याने काही प्रमाणात रोगराई पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. पुढील दोन-चार दिवस हवामान कोरडे राहण्याचीशक्यता आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Unusually Warm Weather Continues in the Goa Ahead of Diwali

पणजी: अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली असताना अजूनही राज्यात थंडीची चाहूल नाही. एरव्ही किमान दिवाळीच्या सात-आठ दिवस अगोदर थंडीची चाहूल लागायची कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या खाली असायचे; परंतु यंदा अजूनही थंडी पडलेली नाही.

मात्र, मोठ्या प्रमाणात वाढलेल्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. पंखा किंवा वातानुकूलन यंत्रणेविना राहणे असह्य होत आहे. पाऊस बंद झाल्यानंतर ऐन हिवाळ्याच्या दिवसांत कडक ऊन पडत असल्याने काही प्रमाणात रोगराई पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

सध्याच्या वातावरणाबाबत सांगताना गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी म्हणाले की, राज्यात तापमानाची जी सध्या स्थिती आहे तशीच पुढील काही दिवस असण्याची शक्यता आहे. पुढील दोन-चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics : ''डबल इंजिन'चे आश्वासन Fail!आता जनताच भाजपला धडा शिकवेल; माणिकराव ठाकरे-अमित पाटकरांचा घणाघात

IPL 2026 Auction: गोव्याचे क्रिकेटपटू 'आयपीएल' लिलावात पसंतीविना; सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा व आणि ललित यादव Unsold

Drishti Marine: समुद्रात बुडणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवदान, दृष्टी मरीनची कामगिरी; दोन बेपत्ता मुलांना काढले शोधून

Goa News Live: लुथरा बंधूंच्या अटकेवर मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे मौन

Goa Agriculture: आंबा मोहरला, समाधानकारक पीक शक्य; थंडीचा परिणाम, काणकोणात काजू बोंडू धरण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT