Brands Of Goa Program Dainik Gomantak
गोवा

गोव्यात प्रदूषणकारी उद्योग नकोत...

‘ब्रँडस्‌ ऑफ गोवा’ सोहळ्यातील चर्चासत्रात मान्‍यवरांचा सूर

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्‍याचा विकास करताना पर्यावरणाविषयी तडजोड केली जाणार नाही. तसेच प्रदूषणकारी प्रकल्‍प किंवा उद्योग येणार नाहीत, याची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल, अशी ग्‍वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मिरामार येथील हॉटेल सिदाद दी गोवामध्ये झालेल्‍या गोमन्‍तक आयोजित 'ब्रँडस्‌ ऑफ गोवा' या सोहळ्यावेळी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी प्रदूषणकारी उद्योग राज्यात नकोत,अशी भूमिका मांडली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले,की टीका करणे तसेच सल्ले देणेही सोपे असते. राज्‍याचा प्रमुख या नात्‍याने सर्व घटकांचा विचार करावा लागतो. शाश्‍वत विकास आणि सातत्यपूर्ण प्रगतीसाठी विविध क्षेत्रातील प्रकल्‍प राज्‍यात होऊ पाहात आहेत. पण काहींच्‍या विरोधामुळे या प्रकल्‍पांना खीळ बसत आहे.

यावेळी गोव्‍याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, आमदार दिगंबर कामत, कृषीमंत्री रवी नाईक, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, राज्‍यसभा खासदार लुईझिन फालेरो, गोमन्‍तकचे संचालक संपादक राजू नायक यांनी सहभाग घेतला. यावेळी नायक यांनी विचारलेल्‍या आपण गोव्‍याकडे कसे पाहता? या प्रश्‍नावर बोलताना दिगंबर कामत म्‍हणाले, सदृढ अर्थव्‍यवस्‍थेसाठी राज्‍यात उद्योग येणे आवश्‍यक आहे. पण सध्या येथील अनेक कंपन्‍यांत गोमंतकीय युवकांना रोजगार मिळत नाही. यासाठी येणाऱ्या उद्योगांचा पूर्ण अभ्यास करावा. आपला गोवा छोटा आहे. तसेच तो पर्यटनावर अवलंबून आहे. यासाठी येथे प्रदूषणकारी उद्योग येता कामा नये. येणाऱ्या उद्योगांत गोमंतकीय तरुणांना संधी मिळायला हवी.

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे म्‍हणाले, प्रदूषण ही मोठी समस्या आहे. प्रदूषणकारी उद्योगांमुळे नद्या, नाले, पाण्याचे स्रोत, विहिरी प्रदूषित होतात. जलचरांवर परिणाम होतो. आपल्‍याकडे प्रत्‍येक तालुक्‍यात एक औद्योगिक वसाहत आहे. याठिकाणी सॉफ्टवेअर, इंजिनिरियरींग, इलेक्‍ट्रिक, इलेक्ट्रॉनिक आदी क्षेत्रातील उद्योगांना प्राधान्‍य देणे आवश्‍यक आहे.

आजी-माजी सहा मुख्यमंत्री एका व्‍यासपीठावर

या सोहळ्याला प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, रवी नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर, लुईझिन फालेरो या माजी मुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही उपस्‍थित होते. हा सन्मान सोहळा घडवून आणल्‍याबद्दल उपस्‍थितांतून गोमन्‍तकचे कौतुक होत होते. तसेच एका व्‍यासपीठावर आजी-माजी सहा मुख्यमंत्री आले हा मोठा योगायोग म्हणावा. या दिग्गजांमध्ये थोडी चर्चाही रंगली.

उद्योगपूरक शिक्षण द्या

माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो म्‍हणाले, गोमंतकीयांमधील कौशल्याचा विचार करून उद्योग उभारले पाहिजेत. कारण अनेक कंपन्‍यांना कुशल कामगार मिळत नाहीत. मग या कंपन्‍या परराज्‍यातून कामगारांची आयात करतात. साहजिकच येथील युवकांना रोजगार मिळत नाहीत. यासाठी गोमंतकीय युवकांना राज्‍यातील उद्योगांना पूरक कौशल्‍य शिक्षण द्यावे.

पर्यावरण जपणे गरजेचे

कृषीमंत्री रवी नाईक म्‍हणाले, आपल्‍याकडे जमिनीचे प्रमाण कमी आहेत. तसेच सरकारकडेही मोठ्या प्रमाणात जमिनी उपलब्‍ध नाहीत. एखाद्या उद्योगाला मोठी जमीन हवी तर ती कोमुनिदादकडून वा खासगी व्‍यक्‍तीकडून खरेदी करावी लागते. आर्थिकदृष्टया राज्‍याला हे शक्‍य नाही. आपल्‍या जमिनी, आपले पर्यावरण जपले पाहिजे. यासाठी प्रदूषणविरहित उद्योग आणावेत.

उद्योगांनी शाळा दत्तक घ्याव्यात: माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले,की राज्‍यात असलेल्‍या उद्योगांनी ग्रामीण भागातील तसेच उपनगरांतील शाळा दत्तक घ्यायला हव्‍यात. सर्वच गोष्टी सरकारने करावी, अशी अपेक्षा करणे योग्‍य नव्‍हे. त्‍यापेक्षा उद्योगांनी स्‍वतः पुढाकार घेऊन उत्तरदायित्त्व पार पाडावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT