South Goa District Hospital Dainik Gomantak
गोवा

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाबाहेर पार्किंगसाठी ‘दंड’ नाहीच

वाहतूक पोलिस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांचं स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाबाहेर रुग्णांना किंवा त्यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींना वाहने पार्क करुन ठेवल्‍यास पोलिस चलन देणार नाहीत. इस्पितळ कुंपणाच्‍या आत वाहने ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे आम्ही इस्पितळाबाहेर वाहने पार्क करणाऱ्यांना दंड न ठोठावण्‍याचा निर्णय यापूर्वीच घेतला असल्याचे वाहतूक पोलिस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पार्किंग (Parking) समस्येवर गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने तोडगा काढला आहे. महामंडळाचे सरव्यवस्थापक ज्युड कार्वाल्हो यांनी सांगितले की, वाहन ठेवण्यासाठी हॉस्पिटलमागील (Hospital) भागाचा उपयोग करण्यात येईल. त्यासाठी हॉस्पिटलच्या मागील कुंपणाचा दरवाजा खुला केला जाईल व वाहने ठेवण्यासाठी व्यवस्था केली जाईल.

हॉस्पिटलच्या या मागील भागाचा विकास केला जाईल आणि तिथे पेव्हर्स बसविले जातील, असेही कार्व्हालो यांनी सांगितले आहे. उपजिल्हाधिकारी रोशेल फर्नांडिस यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला ‘गोवा कॅन’ने दिलेल्या निवेदनाचा संदर्भ घेत जिल्हा इस्पितळाबाहेरली वाहतूक (Traffic) समस्येबद्दल योग्य निर्णय घेण्याच्या सूचना पत्रातून केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT