No Number Plate Vehicles Dainik Gomantak
गोवा

Mandrem: नंबर प्लेट नसलेली वाहने सुसाट! गैरव्यवहाराचा संशय; वाहतूक विभागाची डोळेझाक

No Number Plate Vehicles At Mandrem: विदेशी पर्यटक नंबरप्लेट नसलेली वाहने रस्त्यावर घेऊन सुसाट वेगाने जात असतात. याकडे सरकार आणि वाहतूक खाते, तसेच वाहतूक पोलिस कधी कारवाई करतील, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

No Number Plate Vehicles in Goa Mandrem

मोरजी: पर्यटन हंगाम सुरू झाला की, एक ना अनेक घटना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष घडत असतात. गैरधंदेही सुरू झालेले असतात. अवैध टॅक्सी व्यवसाय करत असल्याचे चित्र असतानाच आता काही विदेशी पर्यटक नंबरप्लेट नसलेली वाहने रस्त्यावर घेऊन सुसाट वेगाने जात असतात. याकडे सरकार आणि वाहतूक खाते, तसेच वाहतूक पोलिस कधी कारवाई करतील, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.

मांद्रे मतदारसंघातील किनारी भागामधून मोठ्या प्रमाणात सध्या विदेशी पर्यटक बेकायदेशीर वाहनांचा व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसून येते. मागच्या पंधरा दिवसापूर्वी एक विदेशी पर्यटक काही पर्यटकांना घेऊन वाहनांमध्ये जात असल्या ने स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

हा प्रकार वारंवार चालू असतो विदेशी पर्यटक खाजगी वाहने घेऊन भाडेपट्टी व्यवसायिक करत असल्याचे चित्र दिसून येते. आता मोठ्या प्रमाणात काही देशी विदेशी पर्यटक ज्या वाहनांना क्रमांकच नाही. अशी वाहने सुसाट वेगाने चालवत असतात. ही वाहने चोरीची तर नाहीत ना? असा सवाल काही नागरिक उपस्थित करत आहेत. शिवाय या वाहनांमधून गैरव्यवहार सुरू नसेल ना, असाही संशय व्यक्त केला जात आहे. या वाहनांवर पोलिसांनी आणि वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे.

नंबरप्लेट नसलेली वाहने जे पर्यटक किंवा नागरिक वाहने चालवतात, त्यांच्यावर कारवाई का होत नाही. वाहतूक पोलिस चोपडे शिवोली पुलावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी उभे असतात. मात्र, त्यांना ही नंबरप्लेट नसलेली वाहने दिसत कशी नाहीत,असा प्रश्‍न मदन सावळ यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT