फोंडा नगरपालिका  Dainik Gomantak
गोवा

फोंडा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षाविरुद्ध आठ नगरसेवकांकडून अविश्‍वास ठराव

शुक्रवारी हा अविश्‍वास ठराव दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंडा पालिकेत आता सत्तांतर होणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. फोंडा पालिकेच्या विद्यमान नगराध्यक्ष गिताली तळावलीकर व उपनगराध्यक्ष जया सावंत यांच्याविरुद्ध आठ नगरसेवकांनी अविश्‍वास ठराव आणला आहे. शुक्रवारी हा अविश्‍वास ठराव दाखल करण्यात आला आहे. या अविश्‍वास ठरावावर रितेश नाईक, विश्‍वनाथ दळवी, आनंद नाईक, वीरेंद्र ढवळीकर, अर्चना नाईक डांगी, यतिश सावकर, विलियम आगियार व चंद्रकला नाईक यांच्या सह्या आहेत.

फोंडा पालिकेवर सध्या मगो प्रणित गट सत्तारूढ असून नुकत्याच राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळून सत्तेवर आल्याने आता फोंडा पालिका आपल्या कह्यात ठेवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत.

फोंडा पालिकेच्या या मंडळात आतापर्यंत पाच नगराध्यक्षांची निवड झाली असून हा अविश्‍वास ठराव संमत झाल्यास सहाव्या नगराध्यक्षाची निवड होणार आहे. सुरवातीला प्रदीप नाईक, त्यानंतर व्यंकटेश नाईक, विश्‍वनाथ दळवी, शांताराम कोलवेकर तसेच आता गिताली तळावलीकर या पाचजणांची वर्णी फोंड्याच्या नगराध्यक्षपदी लागली असून सहाव्या नगराध्यक्षाच्या प्रतीक्षेत आता फोंडा पालिका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT