Viriato Fernandes Canva, Dainik Gomantak
गोवा

Mhadei Water Dispute: म्‍हादई प्रश्‍नावर कुठलीही तडजोड करणार नाही; विरियातो फर्नांडिस

Viriato Fernandes: गोव्‍यातील काँग्रेसने म्‍हादईबाबतीत तडजोड करण्‍याची गरज नाहीअसे खुद्द पक्षश्रेष्‍ठींनी सांगितलेले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार सत्तेवर असले तरीही आम्‍ही गोव्‍यात म्‍हादई प्रश्‍नावर कुठलीही तडजोड करणार नाही. म्‍हादई हा आमचा जीवन मरणाचा प्रश्‍न आहे. त्‍यामुळे म्‍हादईचे पाणी कर्नाटकात वळविण्‍याला आमचा ठाम विरोध असेल, असे मत दक्षिण गोव्‍याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी व्‍यक्‍त केले.

आज कॅ. फर्नांिडस यांनी मडगावातील पत्रकारांशी संवाद साधला असता, त्‍यांनी ही माहिती दिली. गोव्‍यातील काँग्रेसने म्‍हादईबाबतीत कुठलीही तडजोड करण्‍याची गरज नाही, असे आम्‍हाला खुद्द पक्षश्रेष्‍ठींनी सांगितलेले आहे. त्‍यामुळे कर्नाटकाला फायदा हाेईल, अशी कुठलीही भूमिका गोव्‍यातील काँग्रेस घेणार नाही, असेही त्‍यांनी सांगितले.

कॅ. फर्नांडिस यांची भेट घेण्‍यासाठी आज ‘बीएसएनएल’ चे अधिकारी आले होते. त्‍यांच्‍याशी कॅ. फर्नांडिस यांनी चर्चा केली. गाेव्‍यात ग्रामीण भागात माेबाईल नेटवर्कची कनेक्‍टिव्‍हीटी वाढावी यासाठी ‘बीएसएनएल’ने प्रयत्‍न करावेत.इतर कंपन्‍यांच्‍या तुलनेत ‘बीएसएनएल’ची सेवा स्‍वस्‍त असल्‍याने लाेकांना त्‍याचा फायदा होऊ शकतो. त्‍यामुळे या संबंधी ‘बीएसएनएल’ने ग्रामीण भागात जाऊन जागृती करावी, अशी सूचनाही त्‍यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT