Khola Chilli|Cancona Chilli|Khola Mirachi|Khola Mirch sahasa
गोवा

Khola Chilli: खोला मिरची उत्पादनाचा हक्क फक्त आदिवासी समुदायाला; शेतकरी प्राधिकरणचा निर्णय

Khola Mirachi: प्राधिकऱणाने खोला मिरचीला शेतकरी वनस्पती विविधता म्हणून घोषित केले आहे, अशी नोंदणीकृत होणारी राज्यातील ही पहिली शेतकरी वनस्पती

गोमन्तक डिजिटल टीम

Khola Mirch

पणजी: खोला मिरचीचे उत्पादन हे तेथील आदिवासी समुदायाचेच असल्यावर केंद्र सरकारच्या वनस्पती जातींचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे यापुढे खोलाच्या आदिवासी समुदायाशिवाय अन्य कोणासही खोला मिरचीचे व्यावसायिक कारणास्तव उत्पादन घेता येणार नाही. याआधी खोला मिरचीला भौगोलिक मानांकन देण्यात आले आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या जुने गोवे येथील केंद्रातून डॉ. ए. आर. देसाई यावर अनेक वर्षे काम करत होते. त्यांनी ‘कार्दोज मानकुराद’ या आंब्यालाही अशीच मान्यता मिळावी, यासाठीही काम केले आहे. मात्र, अद्याप ती मान्यता मिळालेली नाही.

खोला मिरचीचा विशिष्ट रंग, चव यांचा विचार यासाठी करण्यात आला आहे. देसाई सेवानिवृत्त झाल्यावरही हे काम सुरू ठेवले होते, अशी माहिती तटीय राज्ये कृषी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. प्रवीण कुमार यांनी दिली. ते म्हणाले की, पारंपरिकपणे शेतकरी उत्पादन घेतात. अनेकजण वनस्पतींचा वापर करून पारंपरिकरित्या औषधोपचारही मोफत दिले जायचे. आता ते दिवस राहिलेले नाहीत. पारंपरिक ज्ञानाची चोरी होते आणि स्वामीत्वधन मागितले जाते. ते टाळण्यासाठी पारंपरिक ज्ञानाला कायदेशीर संरक्षण दिले पाहिजे, यासाठी केंद्र सरकारने कायदा केला आहे.

शेतकरी वनस्पती विविधता घोषित

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या ज्ञानाला संरक्षण देण्यासाठी कायदा केला आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जाते. त्या प्राधिकऱणाने खोला मिरचीला शेतकरी वनस्पती विविधता म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे. अशी नोंदणीकृत होणारी राज्यातील ही पहिली शेतकरी वनस्पती आहे.

आदिवासी समाज पिढ्यान पिढ्या खोला मिरचीचे उत्पादन घेत आहे. त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांना खोला मिरचीबाबत ज्ञान होते, ते त्यांनी पुढील पिढ्यांना दिले. त्यांनी कोणत्याही बाह्य पाठिंब्याशिवाय हे उत्पादन घेणे सुरू ठेवले. मिरचीच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांचा अभ्यास करून आम्ही नोंदणीसाठी शिफारस व पाठपुरावा केला. प्राधिकरणाने उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले, त्यामुळेच हे शक्य झाले आहे.
डॉ. ए. आर. देसाई.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT