Madgaon Municipal Council Dainik Gomantak
गोवा

मडगाव पालिकेच्या हिशोबाचे चार वर्षांचे ऑडिटच नाही!

मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची तक्रारदार नगरसेवकाची मागणी

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगावला आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. तरीही गेल्या चार वर्षांपासून पालिकेच्या हिशोबाचे ऑडिट झाले नसल्याने याविरुद्ध खुद्द नगरसेवकाने तोंड उघडले आहे. गत चार वर्षांत मडगाव नगरपालिकेच्या हिशोबाचे ऑडिट झाले नसल्याचा आरोप नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी केला आहे. नगरपालिकेच्या खास बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना घनश्याम यांनी हा आरोप केला.

मडगावप्रमाणे इतर पालिकेच्या हिशोबाचे जर ऑडिट झालेले नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावे असेही शिरोडकर यांनी सांगितले. ऑडिट झाले नसल्याने नगरपालिका भ्रष्टाचाराचे आगर बनल्याचा आरोप शिरोडकर यांनी केला असून, पालिकेचे ऑडिट 2017-18, 2018-19, 2019-2020, 2020-2021 या चार वर्षांसाठी झाले नाही. हिशोबाचे ऑडिट न झाल्याने पालिकेच्या अर्थसंकल्पाच्या वेळी सरकारकडून किती अनुदान आले. इतर स्त्रोताकडून किती रक्कम आली, खर्च किती झाला व शिल्लक किती उरले हे कळणे कठीण असल्याचे शिरोडकर म्हणाले.

एरव्ही ऑडिट करण्याची जबाबदारी लेखा संचालनालयाची आहे. जर ऑडिट होत नसेल तर भ्रष्टाचाराला एकप्रकारे ते उत्तेजनच मिळत असल्याचा अर्थ होतो. दहा वर्षांपूर्वी सरकारकडून नगरपालिकेला पार्किंग इमारतीसाठी 3 कोटी रुपये अनुदान देण्यात आले होते. पण त्याचा वापर केला नसल्याने आता नगरपालिका प्रशासन संचालनालयाने ही रक्कम परत करण्यास सांगितले आहे. नगरपालिकेने वापर प्रमाणपत्रही सादर केले नसल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT