No action has been taken on 1382 claims filed for land rights under the Mundkar Act in south goa Dainik Gomantak
गोवा

South Goa: मुंडकार कायद्याखाली जमीन हक्कासाठी दाखल केलेले 1382 दावे पडून

घरांची मालकी देण्यासाठी नवीन कायदा आणण्यापेक्षा, आहे त्याच कायद्यांचीच प्रभावी अंमलबजावणी करा असा सूर विरोधकांकडून पुढे येत आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: 30 वर्षे गोव्यात वास्तव्य करून असलेल्याना त्यांच्या घराचे हक्क मिळावेत म्हणून भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक आणल्याचे एकाबाजूने सरकार सांगत असले तरी दुसऱ्या बाजूला मुंडकार हक्क कायद्याखाली (Mundkar Act Goa) घराचा हक्क मिळावा यासाठी दाखल केलेले शेकडो दावे मागच्या 5 वर्षात मामलेदार कार्यालयात खितपत पडले आहेत. दक्षिण गोव्यातच (South goa) अशा प्रलंबित दाव्यांची संख्या 1382 एव्हढी प्रचंड आहे. (No action has been taken on 1382 claims filed for land rights under the Mundkar Act)

No action has been taken on 1382 claims filed for land rights under the Mundkar Act in south goa

घरांची मालकी देण्यासाठी नवीन कायदा आणण्यापेक्षा, आहे त्याच कायद्यांचीच प्रभावी अंमलबजावणी करा असा सूर विरोधकांकडून पुढे येत आहे. हे पडून राहिलेले दावे सरकारची या बाबतची निष्क्रियता स्पष्ट करत आहे. याशिवाय वनवासी हक्क कायद्याखाली जमिनीचे अधिकार मिळावेत यासाठी केलेले 10 हजारापेक्षा अधिक दावे सध्या दक्षिण गोव्यातील वेगवेगळ्या मामलेदारांच्या न्यायालयात प्रलंबित आहेत.

मुंडकार हक्क कायद्याखाली एका सासष्टी तालुक्यातच तब्बल 621 दावे प्रलंबित असून त्याच्या पाठोपाठ फोंडा तालुक्यात 413 दावे प्रलंबित आहेत. मुरगाव येथे 127, काणकोण येथे 118, केपे येथे 65, सांगे येथे 31 तर धारबांदोडा तालुक्यात असे 7 दावे प्रलंबित आहे.

किचकट कायदेशीर प्रकियेमुळे हे दावे पडून राहत असल्याची माहिती केपे येथील वकील आणि केपे आदिवासी संघटनेचे निमंत्रक ऍड. जुआव फेर्नांडिस यांनी सांगितले. हे अधिकार मिळण्यासाठी नगर नियोजन खात्याचा ना हरकत दाखला लागतो. ही अट शिथिल करावी यासाठी आम्ही नगर नियोजन खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर याना निवेदन दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Madhav Gadgil: झाडांनी दिली मानवंदना, माणसं मात्र जेमतेम! गाडगीळ यांचा अखेरचा प्रवास एकाकी : 'मनोरामा'च्या फोटो एडिटरची भावनिक पोस्ट

ISRO Research: सौर वादळांचा उपग्रहांवर परिणाम, 'आदित्य एल-1'च्या निरीक्षणांवर 'इस्रो'चे संशोधन

Premanand Maharaj Flat Fire: मथुरा येथील प्रेमानंद महाराजांच्या फ्लॅटला आग, सामान जळून खाक

Women's U-15 Cricket: गोव्याला 35 षटके फलंदाजीचे समाधान, जोया मीरचे अर्धशतक; पाचव्या पराभवासह मोहीम आटोपली

Illegal Sand Mining: शापोरात बेकायदेशीर रेती उत्खनन, आगरवाडा जैवविविधता मंडळामार्फत तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT