Nitin Gadkari inaugurates India's first cable-stayed bridge built on a curve connecting Sada to Varunapuri & Dabolim Int'l airport Dainik Gomantak
गोवा

Vasco: मुरगाव रवींद्र भवन ते एमपीटीला जोडणाऱ्या उड्डाण पुलाचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन, पाच प्रकल्पांचीही पायाभरणी

India's first cable-stayed bridge In Goa: रवींद्र भवन मुरगाव ते एमपीटी गेट नंबर नऊला जोडणाऱ्या या महामार्गामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.

Pramod Yadav

वास्को: मुरगाव रवींद्र भवन ते एमपीटीला जोडणाऱ्या उड्डाण पुलाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज (२१ जानेवारी) रात्री साडे सात वाजता पार पडले. यासह ३,५०० कोटी रुपयांच्या इतर पाच प्रकल्पांची देखील पायाभरणी करण्यात आली. ५८ किलोमीटर लांबीच्या दक्षिण गोव्यातील या महामार्गामुळे जिल्ह्यातील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.

या उद्घाटन कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर, वाहतूक आणि पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, मत्स्य खात्याचे मंत्री नीलकंठ हळर्णकर, बंदर खाते व कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा, वीज मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार उल्हास तुयेकर यासह इतर नेते उपस्थित होते.

सडा ते वरुणापूरी दरम्यान उभारण्यात आलेल्या या महामार्गामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. तसेच, अवजड वाहनांना कायमचा पर्याय मिळणार आहे.

भूमिपूजन झालेली विकासकामे

१) एमईएस महाविद्यालय जंक्शन ते बोगमाळो जंक्शन आणि क्वीनी जंक्शन या ४ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूल.

२) झुआरी पुलापासून ते मडगाव बगल मार्गापर्यंतच्या चौपदरी महामार्गाचे (सात किलोमीटर) काम.

३) नावेली ते कुंकळ्ळी चार पदरी मार्गाचे (सात किलोमीटर) भूमिपूजन.

४) बेंदुर्डे ते पोळेपर्यंतच्या २२.१० किलोमीटर लांबीच्या चौपदरी महामार्ग.

५) तसेच, फोंडा ते भोमा या १० किलोमीटर लांबीच्या महामार्ग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: वय वर्षे 84, तरीही गणरायाची सेवा; वयाच्या 10व्या वर्षांपासून जोपासली आहे मूर्तिकलेची आवड

Goa Live News: मरड-धारबांदोडा येथील बेकायदेशीर चिरे खाणीवर छापा!

Bear Attack Quepem: चिंताजनक! अस्वलाने केला प्राणघातक हल्ला, केपेतील शेतकरी गंभीर जखमी

Goa Politics: सोमवारी होणार खातेवाटप, दामू नाईकांची स्पष्टोक्ती; अमावस्येमुळे निर्णय लांबल्याचा निर्वाळा

Goa Cricket: दिल्ली कॅपिटलचा 'हा' आक्रमक फलंदाज खेळणार गोव्याकडून, अष्टपैलू खेळाडूमुळे वाढली ताकत

SCROLL FOR NEXT