Nitin Gadkari Announce Goa Metro project  Dainik Gomantak
गोवा

गोव्याला मेट्रो देणारच, नितीन गडकरींचं आश्वासन

सरकारला पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी हवा तो प्लॅन करा आणि माझ्याकडे या मी ते नक्की करेन आणि गोव्याला मेट्रो (Goa Metro) नक्की देईन असा विश्वास नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे आज सोमवारी 1 नोव्हेंबर 2021 रोजी गोव्यात दाबोळी विमानतळावर (Dabolim Airport) आगमन झाले. त्यांचे स्वागत मंत्री माविन गुदिन्हो यांनी केले. केंद्रीय मंत्री 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी गोव्याच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.(Nitin Gadkari Announce Goa Metro project)

या कार्यक्रमात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी आपले मत व्यक्त केले. नितीन गडकरी आज गोव्यात 3 प्रकल्पांसाठी आले तुम्हाला प्रश्न पडला असेल की या हे 3 प्रोजेक्ट कोणते? एक टेलिमेडिसिल प्रोजेक्ट दुसरे मिसिंग लिंक आणि तिसरे येणाऱ्या काळातील काही नविन प्रोजोक्ट.गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांना फोन करून गडकरजींनी विचारले होते की गोव्याला काय हवं आहे. त्या सर्व सुविधा गडकरींनी आज पुर्ण केल्या आहेत आणि पुढेही ते करतील अशी अशा देखील मुख्यमंत्री सावंत यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली आहे.

या कार्यक्रमात नितीन गडकरी भावुक झालेले पाहायला मिळाले कारण मनोहर पर्रीकरांच्या उपस्थिती गोव्यात मांडवी पुलाचे उद्घाटन झाले होते आणि आज मिसिंग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी मला पुन्हा गोव्यात यायाची संधी मिळाली असे सांगतांना आज मला आनंद होत आहे. आज गोव्याच्या विकासासाठी ज्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी केल्या त्या आमच्या विभागाने पुर्ण केल्या. मुंबई आणि गोवा महामार्गाच्या कामात अनेक अडचणी आल्या मात्र हा रस्ता एक दिड वर्षात पुर्ण होईल असे ठामपणे सांगतच गडकरींनी हा रस्ता पुढे कर्नाटक पर्यंत नेणार असल्याचेही अश्वासन दिले आहे.

झुवारी ब्रिजचं काम सध्या गोव्यात सुरू आहे त्याचबरोबर स्थानिक व्यावसायिकांसाठी या ठिकाणी व्यवसाय केंद्रे उभारणार असल्याची ग्वाही नितीन गडकरी यांनी यावेळी दिली आहे. त्याचबरोबर पणजी ते कर्नाटक महामार्ग 2022 पर्यंत पुर्ण करण्याच असल्याचे देखील गडकरींनी यावेळी सांगतले आहे.

मनोहरजी असतांना मोपा एअरपोर्टचे काम झाले. आता एअर पोर्टला मार्ग जोडणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे हा रोड राज्य सरकारने बांधावा असे सांगण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्री सावंत यांनी विनंती केली आणि आम्ही हा रोडही बांधून देण्याच टेंडर काढलं. अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली आहे.

त्याचबरोबर त्यांनी गोवा सरकारला पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी हवा तो प्लॅन करा आणि माझ्याकडे या मी तो नक्की पुर्ण करेन आणि गोव्याला मेट्रो (Goa Metro) देण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT