NIT Goa Campus Video: गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ. मनोहर पर्रिकर यांच्या संकल्पनेतील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (NIT) कायमस्वरूपी कॅम्पसचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन आज होत आहे.
या तांत्रिक शिक्षण संस्थेत गोमन्तकीय विद्यार्थ्यांसाठी 40 टक्के जागा आरक्षित असणार आहेत. कुंकळ्ळी येथील या कॅम्पसचा विहंगम व्हिडिओ समोर आला आहे.
गोव्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची संस्था स्थापन करण्याचे डॉ. मनोहर पर्रिकर यांचे उद्दिष्ट होते. राज्याची शिक्षणाचे केंद्र म्हणूनही ओळख निर्माण व्हावी अशी त्यांची इच्छा होती.
एनआयटी गोवाचे कामकाज 2010 मध्ये गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय, फार्मागुडी, फोंडा, गोवा येथे तात्पुरत्या कॅम्पसमध्ये सुरु होते.
संस्थेच्या कायमस्वरूपी कॅम्पससाठी, गोवा सरकारने जुलै 2017 मध्ये कुंकळ्ळीत 45,6767 चौ.मी. (113 एकर) जमीन हस्तांतरित केली होती. 15 डिसेंबर 2018 रोजी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. मनोहर पर्रिकर यांनी तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत कॅम्पसची पायाभरणी केली होती.
मे 2019 मध्ये, CPWD या प्रकल्प देखरेख समितीच्या मार्गदर्शनाखाली 46 एकर जागेत एनआयटी गोवा कॅम्पसच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम सुरु झाले. कॅम्पसचे बांधकाम RCC प्रीकास्ट 3S तंत्रज्ञान वापरून करण्यात आले आहे.
कॅम्पसमध्ये एकूण 70,750 चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम झाले असून, त्यासाठी रु. 390.83 कोटी खर्च करण्यात आला असून, याची 1,260 विद्यार्थी क्षमता आहे.
कॅम्पस ट्यूटोरियल कॉम्प्लेक्स, विभागीय कॉम्प्लेक्स, सेमिनार कॉम्प्लेक्स, प्रशासकीय कॉम्प्लेक्स, वसतिगृहे, आरोग्य केंद्र, कर्मचारी निवासस्थान, सुविधा केंद्र आणि क्रीडांगण यासारख्या विविध सुविधांनी सुसज्ज आहे.
कॅम्पसमध्ये सौर ऊर्जा प्लांट, सांडपाणी प्रक्रिया प्लांट, पाण्याची बचत करणारी फिटिंग्ज आणि प्रसाधन गृहे, विद्युत दिवे आणि सौर उर्जेवर चालणारे पथ दिवे, यासारखी पर्यावरणाला अनुकूल अनेक वैशिष्ट्ये आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.