Paingin Meeting  Dainik Gomantak
गोवा

Canacona News: तळपण, गालजीबाग नदीची पात्रं होणार गाळमुक्त

NIOT Meeting At Paingin: पैंगीणमध्ये आयोजित वैज्ञानिकांच्या बैठकीत स्पष्टीकरण

गोमन्तक डिजिटल टीम

तळपण, गालजीबाग नदीचे पात्र गाळ मुक्त करण्यात येणार असून किनाऱ्यांची धूपही रोखण्यात येणार आहे. त्याबाबत उपाययोजना केल्या जातील, असे वैज्ञानिकांनी पैंगीण येथे घेतलेल्या बैठकीत स्पष्ट केले.

चेन्नई येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने जलस्रोत खात्याने राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्पा अंतर्गत तळपण किनारा व नदीचे खोरे व्यवस्थापनासंदर्भात शुक्रवारी महालवाडा, पैंगीण येथील आपत्ती व्यवस्थापन आसरा सभागृहात स्थानिक रहिवासी व सरपंच, पंचांची बैठक घेतली. यावेळी तज्ज्ञांनी किनारा व नदी पात्राच्या संरक्षणासाठी तयार केलेला आराखडा चलचित्राद्वारे उपस्थितांसमोर सादर केला. त्यानंतर त्याविषयी सविस्तर माहिती दिली.

सरपंच सविता तवडकर, उपसरपंच सुनील पैंगणकर, पंच प्रवीर भंडारी, अस्मिता जोशी, पैंगीण जैवविविधता समितीचे अध्यक्ष सुभाष महाले यांनी वैज्ञानिकासमवेत तळपण किनारा व नदीच्या मुखाकडील पात्रांची पाहाणी केली.

राज्यातील ९० टक्के किनाऱ्याची झीज झाली आहे. तळपण किनाऱ्याची ३४ टक्के झीज झाली आहे. याला वेगवेगळी कारणे आहेत. त्यात वादळे, त्सुनामी, हवामान बदल तसेच मानवनिर्मित कारणे जबाबदार आहेत.

तळपण किनाऱ्याची झीज रोखण्यासाठी किनाऱ्यावर संरक्षक भिंत उभारणे, वृक्षांची लागवड व नैसर्गिक झाडे वाढण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण करणे किंवा दोन्ही पर्यायाने मिश्रण करून उपाय योजना तयार करणे शक्य असल्याचे चेन्नई येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान तंत्रज्ञान संस्थेचे वैज्ञानिक अरुण कुमार यांनी सांगितले.

‘बेसाल्ट’ची भिंत

१९९२ मध्ये तळपण किनाऱ्याची झीज रोखण्यासाठी बेसाल्ट दगडांची भिंत उभारण्यात आली, मात्र ती खचू लागली आहे. उर्वरीत किनाऱ्यावरही भिंत उभारण्याची मागणी रहिवाशांनी केली होती, मात्र ही निविदा स्विकारण्यास कोणीच पुढे येत नसल्याचे स्थानिकांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

Hampi History: हत्तींसाठी राजेशाही तबेले, घोड्यांसाठी हौद अन् भूमिगत कालवे; विजयनगरच्या वैभवाची अद्भुत कहाणी

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT