Goa Drishti Lifeguard Dainik Gomantak
गोवा

कळंगुट दृष्टी जीवरक्षकांकडून नऊ जणांना जीवनदान

द्रुष्ठी जीव रक्षक कर्मचाऱ्यांनी राज्याच्या विविध भागात दोन दिवसात नऊ जणांना दिले नवजीवनदान

दैनिक गोमन्तक

कळंगुट : समुद्रात आंघोळ करतेवेळी पाण्यात बुडून म्रुत्यूच्या दाढेत अडकलेल्या तसेच अन्य कारणांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताने मृत्युच्या जबड्यात अडकलेल्या नऊ जणांना द्रुष्ठी या जीवरक्षक संस्थेच्या कर्मचाऱ्यांना राज्याच्या विविध भागात नऊ जणांना नवजीवन देण्यात आले. द्रुष्टीकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, बागा समुद्रात बुडताना नागपूर तसेच मुंबई स्थित चोवीस तसेच सत्तावीस वर्षीय तरुणांना द्रुष्टीच्या नारायण गोवेकर यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले. (Goa Drishti Lifeguard)

दरम्यान, दुधसागर येथील घटनेत हैद्राबाद येथील 33 वर्षीय तरुणाचा अंगावरील जेकेट सैल पडल्याने पाण्यात बुडण्यापासून द्रुष्टीच्या शहनवाझ नदाफ यांनी वाचवले. अन्य एका घटनेत स्वीमिंग पुलमध्ये गुजरात येथील 37 वर्षीय व्यक्तीला अचानक श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने द्रुष्टीच्या जीवरक्षक हनुमंत भजंत्री यांनी तात्काळ हालचाल करत बुडण्यापासून वाचवले.

तसेच पेडणे तालुक्यातील मोरजी समुद किनारी 50 वर्षीय व्यक्तीला भ्रमिष्ठांवस्थेत किनारी भागात फिरताना द्रुष्टीच्या जीवरक्षक सुहास गांवस यांनी तर वोझरान वागातोर येथील किनाऱ्यावर बपाण्यात गटांगळ्या खात असताना 15 वर्षीय यु्वतीला तात्काळ धाव घेत वाचवण्यात यश मिळवले. कळंगुट तसेच बागा समुद्र किनारी आपल्या कुटुंबियांपासून दूर गेलेल्या लहान मुलांना परिसरात लाऊडस्पीकरवरुन घोषणा देत कुटुंबियांच्या स्वाधीन केले. अन्य एका घटनेत बागा येथील किनाऱ्यावर बंगाली वृद्ध महिला जोरदार लाटेमुळे दुर फेकली गेल्याने श्वासोस्वासाचा त्रास जाणवू लागल्याने द्रुष्टीच्या जीवरक्षकांनी तात्काळ धाव घेत कांदोळीतील आरोग्य केद्रावर दाखल केल्याने वृद्धेचा जीव वाचला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

SCROLL FOR NEXT