Goa Night Club Dainik Gomantak
गोवा

Goa: रात्रीच्या ‘त्या’ पार्ट्यांबाबत पोलिसांचे हात वर!

दैनिक गोमन्तक

Goa: न्यायालयाचे निर्देश धाब्यावर बसवून बागा, वागातोर किनारपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात रात्री उशिरापर्यंत कर्कश आवाजात संगीतरजनी पार्ट्या सुरू आहेत. या पार्ट्यांचा पर्दाफाश ‘गोमन्तक टीम’ने घटनास्थळी रात्री उशिरा जाऊन केला तरी पोलिसांनी डोळ्यावर झापडे लावली आहेत. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना विचारले असता, त्या क्षेत्रातील पोलिस स्थानकात कोणतीच तक्रार आली नसल्याचे सांगून हात वर केले.

वागातोर येथील सनबर्न ईडीएम रात्री 10 वाजण्याच्या सुमारास बंद होत असले तरी या परिसरात असलेली संगीतरजनी पार्ट्यासर्रा सपणे सुरू असल्याचे व्हिडिओ ‘गोमन्तक टीम’ने काढले आहेत.

या रात्री उशिरा सुरू असलेल्या प्रकारांबाबत उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांना विचारले असता ते म्हणाले की, आपल्याकडे किंवा संबंधित पोलिस स्थानकात नियमांचे उल्लंघन केलेल्याची तक्रार आलेली नाही.

न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तसेच कायद्यातील नियमांनुसार रात्री 10 वाजल्यानंतर किनारपट्टी परिसरातील सर्व संगीत पार्ट्या या बंद होतात. त्यामुळेच कोणीच तक्रार केलेली नाही. त्यावर नजर ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्रिय करण्यात आली.

ज्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहे, त्या मोक्याच्या ठिकाणी विशेष पोलिस पथके साध्या वेशात ठेवण्यात आली आहेत. सनबर्न ईडीएमच्या ठिकाणी आयोजकांच्या सुरक्षा रक्षकाव्यतिरिक्त गोवा पोलिसही तेथे नजर ठेवून आहेत. कोणत्याही तेथे हालचाली संशयास्पद वाटल्यास कारवाई केली जात आहे.

‘आम्हाला वरून आदेश आहे की...’ : गोमन्तक प्रतिनिधीने एका आयपीएस अधिकाऱ्याला रात्री 10नंतरही वागातोर येथील लेव्हल क्लबमध्ये कर्कश आवाजाचे संगीत वाजविले जात असल्याचा व्हिडिओ दाखवला. अधिकाऱ्याने म्हापशातील संबंधित अधिकाऱ्याला फोन लावला तर त्याने ‘वरून आदेश असल्याने त्या ठिकाणी पोलिसांची वर्दळ कमी असते’ असे सांगितले. आता वरून आदेश म्हणजे सरकारकडून आला का, असे विचारले असता त्याने मौनव्रत धारण केले.

स्थानिकांच्या तक्रारी, तरीही पोलिस प्रशासन सुस्त

सनबर्न महोत्सव सुरू असलेल्या जागेपासून काही अंतरावर वोझरान-वागातोर परिसरात पोलिसांच्या नाकावर टिच्चून रात्री-बेरात्री संगीत रजन्या पार्ट्या सुरू आहेत, अशा स्थानिकांच्या तक्रारी आहेत. पोलिसांना कळवूनही ते कारवाई करत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहानंतर सार्वजनिक ठिकाणी संगीत वाजवणे बंधनकारक आहे. या गोष्टीची खातरजमा करण्यासाठी ‘गोमन्तक’ प्रतिनिधीने गुरुवारी रात्री बार्देशातील किनारी भागांची पाहणी केली. यावेळी एक-दोन ठिकाणी मध्यरात्री उशिरापर्यंत कानठळ्या बसविणाऱ्या संगीत रजन्या सुरू असल्याचे दिसून आले.

प्रतिनिधीने सुरक्षा रक्षक तसेच बाऊन्सरचे लक्ष चुकवून मध्यरात्री सुरू असलेल्या संगीत रजन्यांचे दुरवरून चित्रीकरण करण्यात यश मिळविले आहे. नियमांचे सर्रास उल्लंघन आणि पुरावे असतानाही पोलिस प्रशासन का कारवाई करत नाही, असा मुद्दा सध्या उपस्थित होत आहे.

तसेच माहिती हक्क आयोगाचे स्थानिक कार्यकर्ते रवी हरमलकर व इतरांनी याबाबतीत सोशल मीडियावरुन व्हिडिओ चित्रफिती प्रसारीत केल्याने याभागात हा विषय सर्वत्र चर्चीला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT