Goa Drug Case | colvale jail Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: कोलवाळ कारागृहातून होतेय अमली पदार्थांची तस्करी, हैद्राबादमध्ये अटक नायजेरियन माफियाचा खुलासा

तेलंगणा राज्य अंमली पदार्थ विरोधी ब्युरो (T-NAB) ने मंगळवारी स्टॅनलीला अटक करुन, 8 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले.

Pramod Yadav

Goa Drug Case

अमली पदार्थ तस्करी प्रकरणी ड्रग माफिया नायजेरियन नागरिक इवला उदोका स्टॅनली याला तेलंगणाच्या राजधानीतून अटक करण्यात आली. स्टॅनलीने पोलिसांच्या चौकशीत अनेक महत्वाचे खुलासे केले.

यावेळी त्याने गोव्यातील मध्यवर्ती कोलवाळ कारागृहातून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा धक्कादायक खुलासा केला.

गोवा तुरुंग अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कैद्यांवर कारवाई करत झडती घेतली असता कारागृहातील कैद्यांकडून मोबाईल जप्त करण्यात आले.

तेलंगणा राज्य अंमली पदार्थ विरोधी ब्युरो (T-NAB) ने मंगळवारी स्टॅनलीला अटक करुन, 8 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. अमली पदार्थ तस्करी प्रकरणी गोव्यातील कोलवाळ कारागृहात अटकेत असलेला ओकरा याच्या मदतीने स्टॅनली तस्करी करत असल्याचे पोलीस तपासातून समोर आले.

इवला उदोका स्टॅनली देशातील अमली पदार्थ तस्करी नेटवर्कमधील एक प्रमुख माफिया असल्याचे तेलंगणा राज्य अंमली पदार्थ विरोधी ब्युरो (T-NAB) ने म्हटले आहे.

व्यवसायाच्या नावाखाली भारतात आलेल्या ओकराला तीन वर्षांपूर्वी गोव्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी अटक केली. ओकरा कोलवाळ तुरुंगात अंडरट्रायल कैदी असून तो स्मार्टफोन देखील वापरत असल्याचे उघड झाले आहे.

स्टॅनलीला अमली पदार्थांची गरज असल्यास तो ओकराला कळवतो. कोलवाळ कारगृहातून ओकरा नेदरलँडमधील आंतरराष्ट्रीय तस्करांना माहिती देतो.

त्यानंतर नेदरलँडमधील विविध वस्तूंमध्ये ड्रग्जचे बॉक्स लपवले जातात आणि ते मालवाहू विमान आणि कुरिअरद्वारे समुद्रमार्गे पुण्यात येतात. पुण्यातून सौरव नावाच्या स्मगलरच्या माध्यमातून स्टॅनलीपर्यंत अमली पदार्थ पोहोचवले जातात.

तुरुंगात असलेला ओकरा केवळ स्टॅनलीलाच नव्हे तर गोव्यासह देशभरातील ड्रग किंगपिनलाही ड्रग्स पुरवठा करतो. ओकराच्या सांगण्यावरून इकडून तिकडे ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या सौरवला पकडले, तर देशातील अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या तस्करांचे संबंध उघड होतील, असा पोलिसांचा दावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bars: पर्यटनवृद्धीसाठी गोव्यात शाळा, मंदिरांपासून 100 मीटरमध्ये 210 मद्यालयांना परवाने; सर्वाधिक बार्देश तालुक्‍यात

Sattari Crime: मास्क घालून घुसले घरात, महिलेवर केला चाकूहल्ला; दिवसाढवळ्या चोरीच्या घटनेने सालेलीत खळबळ

Rashi Bhavishya 07 July 2025: आरोग्यावर लक्ष द्या, खर्च वाढू शकतो; महत्त्वाच्या कामात यश मिळेल

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT