Pernem Guest House Dainik Gomantak
गोवा

पेडण्यातील ‘ते’ गेस्ट हाऊस पाडण्याचा ‘एनजीटी’चा आदेश

आव्हान याचिका फेटाळली; ‘जीसीझेडएमए’च्या आदेशावर शिक्कामोर्तब

दैनिक गोमन्तक

पणजी : पेडण्यातील दुमजली गेस्ट हाऊसचे बांधकाम पाडण्याचा आदेश गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) दिला होता. त्यावर राष्ट्रीय हरित लवादाने शिक्कामोर्तब करत बांधकाम (Construction) मालकाने दाखल केलेली आव्हान याचिका फेटाळली.

या गेस्ट हाऊसचे बांधकाम सीआरझेड कायदा 1991 पूर्वीचे असल्याचा पुरावा मालक सिद्ध करू शकला नाही, असे निरीक्षण लवादाने हा निर्णय देताना आदेशात नोंदवले आहे. बांधकाममालक गणेश ऊर्फ सुजय पै यांनी जीसीझेडएमए आदेशाला आव्हान दिले होते.

जून 2019 मध्ये ‘जीसीझेडएमए’ने सुजय पै यांना गेस्ट हाऊसचे दुमजली बांधकाम व रेस्टॉरंट (Restaurant) पाडण्याचा व तेथील जमीन पूर्वस्थितीत करण्याचा आदेश दिला होता. त्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली होती. ही दोन्ही बांधकामे हरमल येथील वेगवेगळ्या सर्वेमध्ये असली तरी ती 1991 पूर्वीची होती व त्यांचे नुतनीकरण 2009 मध्ये केले होते. त्यामुळे सीआरझेड 1991अधिसूचनेचे उल्लंघन झाल्याचा इन्कार मालकाने केला होता.

-...ते बांधकाम 1991 नंतरचे

या बांधकामांची नव्याने तपासणी केली असता ते 1991 नंतर करण्यात आले असून ते पूर्वीचे असल्याचा कोणताही पुरावा नाही. प्रादेशिक आराखड्यातही हे बांधकाम दाखवलेले नाही. जुने बांधकाम याचिकादाराचे नसून त्याच्याशी या प्रकरणाशी काहीच संबंध नाही, अशी बाजू ‘जीसीझेडएमए’चे वकील तसेच तक्रारदाराच्या वकिलांनी लवादासमोर मांडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT