Anjuna beach Oil Pollution Dainik Gomantak
गोवा

Anjuna beach: हणजूण किनाऱ्यावर पुन्हा तेलगोळे; काळ्या चिकट पदार्थामुळे पर्यटकांसह स्थानिक हैराण

Anjuna beach Oil Pollution: हणजूण समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा तेलाचे गोळे (टार बॉल्स) वाहून आल्यामुळे समुद्रकिनाऱ्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: हणजूण समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा तेलाचे गोळे (टार बॉल्स) वाहून आल्यामुळे समुद्रकिनाऱ्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शनिवारपासून या समुद्रकिनाऱ्यावर तेलगोळेे येण्यास सुरुवात झाली असून, किनाऱ्यालगत काळा आणि चिकट पदार्थ पसरलेला दिसत आहे. यामुळे समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या अनेक पर्यटकांची गैरसोय होत आहे. दरवर्षी साधारणपणे मे महिन्यात ‘टार बॉल्स’ किनाऱ्यावर येणे ही नियमित घटना असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

हा डांबरासारखा पदार्थ समुद्रातून वाहून किनाऱ्यावर आल्याचे सांगत, समुद्रकिनाऱ्यावर फिरताना हा काळा चिकट पदार्थ पायाला चिकटल्याच्या तक्रारी अनेक पर्यटकांनी आणि रहिवाशांनी केल्या आहेत. सध्या अनेक स्थानिक नागरिक आपल्या कुटुंबासह समुद्रात वार्षिक स्नानासाठी येथे येत असतात. त्यामुळे या समस्येची दखल घेऊन स्थानिक पंचायत आणि पर्यटन विभागाने तातडीने समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. दरम्यान, स्थानिक पंचायत आणि पर्यटन विभागाने आवश्यक पावले उचलून किनाऱ्यावर वाहून आलेले टार बॉल्स तातडीने हटवावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

आरोग्यासही धोका

हणजूण-कायसूव जैवविविधता समितीचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी सांगितले की, दरवर्षी हणजूण-वागातोर किनारपट्टीवर हे टार बॉल्स वाहून येतात, ज्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

मे महिन्यात अनेक लोक समुद्रात वार्षिक स्नानासाठी येतात आणि या तेल गोळ्यांच्या संपर्कात आल्यास त्याची आरोग्यासही धोका निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT