New Zuari Bridge Second Lane Dainik Gomantak
गोवा

New Zuari Bridge: नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण होणार; मंत्री नीलेश काब्राल यांची माहिती

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

Kavya Powar

New Zuari Bridge Second Lane: नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे प्रलंबित काम आता अंतिम टप्प्यात आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यंतरीच्या काळात गोव्यातील खराब वातावरणाचा पुलाच्या कामावर परिणाम झाला. त्यामुळे हे काम लांबले.

आता पुलाचे काम येत्या 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारीमध्ये पुलाच्या दुसऱ्या लेनचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृतरित्या मुख्यमंत्री लवकरच तारीख जाहीर करतील.

खरंतर दिवाळीपूर्वी हे काम पूर्ण होऊन दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार होती. मात्र गोव्यातील खराब हवामानामुळे पुलाचे काम काही काळ थांबले, अशी माहिती दिलीप बिल्डकॉनचे स्ट्रक्चरचे उपाध्यक्ष अतुल जोशी यांनी दिली होती. पण आता लवकरच हे प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाचा वेग वाढवला आहे.

नवीन झुआरी पुलासाठी सुमारे 200 हून अधिक केबल्सचा वापर करण्यात आला आहे. या पुलाचे आयुर्मान हे 120 वर्षे असेल असे सांगण्यात येत आहे.

पुलाची देखरेख ही अगोदरची आठ वर्षे दिलीप बिल्डकॉन कंपनी करेल तर नंतर हा पूल गोवा सर्वजनिक बांधकाम खात्याकडे सोपविण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT