Konkani literature Dainik Gomantak
गोवा

Konkani literature: नव्या साहित्यिकांचे फक्त पुरस्कारांवर लक्ष

Konkani literature: प्रकाश वझरीकर : गोव्यात कोकणी भाषा मंडळाचे ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ संस्थेत रूपांतर

दैनिक गोमन्तक

सुशांत कुंकळयेकर

Konkani literature: गोव्यात कोकणी साहित्य चळवळीत एकेकाळी शिखर संस्था म्हणून मार्गदर्शनाचे काम करणारी कोकणी भाषा मंडळ ही संस्था आज फक्त सरकार पुरस्कृत कार्यक्रम राबविणारी इव्हेंट मॅनेजमेंट संस्था ठरली आहे. गोव्यातील नवीन साहित्यिकही फक्त पुरस्कार आणि मानसन्मान यापुरतेच मग्न झाले आहेत, असे परखड मत कोकणी साहित्यिक व समीक्षक प्रा. प्रकाश वझरीकर यांनी मांडले.

शनिवार, ४ रोजी २५व्या कोकणी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून झालेल्या एका परिसंवादात ते बोलत होते. ‘कोकणी साहित्य चळवळ आणि प्रोत्साहनाची पावले’ याविषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात प्रा. वझरीकर यांनी आपली परखड मते मांडली. डॉ. नारायण देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद पार पडला. त्यापूर्वी मुख्य उद्‌घाटन सोहळ्यावेळी संमेलनाध्यक्ष हेमा नायक यांनीही कोकणी साहित्यिक पुरस्कार मिळविण्यातच समाधानी असून या साहित्याचे सामान्य माणसाकडील नाते तुटत चालले आहे, अशी खंत व्यक्त केली होती.

एकेकाळी संघर्ष पर्वातून जाणारी कोकणी चळवळ नंतर साधना पर्वात शिरण्याच्या निमित्ताने संथ झाली. आता तिला काही प्रमाणात बाजारू स्वरूप तर आले नाही ना, असा निष्कर्ष व्यक्त करून आता जे कोकणी साहित्य निर्माण होते ते खरेच सकस आहे का, की ते फक्त पुरस्कार आणि मानसन्मान मिळविण्यापुरतेच सीमित झाले आहे, हे तपासून पाहण्याची गरज वझरीकर यांनी व्यक्त केली.

या परिसंवादाचा समारोप करताना डॉ. नारायण देसाई यांनी, संवेदना आणि साधना यांच्या एकत्रित प्रयत्नांतून सकस आणि दर्जेदार साहित्यनिर्मिती होऊ शकते, असे विवेचन केले. या परिसंवादात पयन्नूर रमेश पै, फा. जेसन पिंटो, आल्फी मोन्तेरो व डॉ. अरविंद शानभाग यांनी भाग घेतला होता.

एके काळी गोव्यात कोकणी भाषा मंडळ ही मार्गदर्शक शिखर संस्था लोकसहभागातून चालायची. आज ती साहित्य व्यवहाराची इव्हेंट मॅनेजमेंट संस्था बनली आहे. या संस्थेने ही आपली नव्याने तयार झालेली प्रतिमा बदलून आपल्या मूळ उद्दिष्टांकडे केंद्रित होऊन शिखर मार्गदर्शक संस्था हे मानांकन पुन्हा एकदा मिळविण्याची गरज आहे. ती सध्याची लोकभावना आहे.
- प्रा. प्रकाश वझरीकर, कोकणी साहित्यिक व समीक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT