Ponda Mayor timesofindia.indiatimes.com, Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipal Council: अखेर फोंड्याचा नगराध्यक्ष ठरला; आनंद नाईक ‘लकी’

Ponda Mayor: निवडीचा तिढा मुख्यमंत्र्यांनी सोडवला आणि चिठ्ठीद्वारे नाईक यांच्या नावाची घोषणा केली

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा नगराध्यक्षपदासाठी अखेर नगरसेवक आनंद नाईक यांची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. गेले काही दिवस नगराध्यक्षपदाचा तिढा उद्‍भवला होता. आनंद नाईक की वीरेंद्र ढवळीकर यापैकी कुणाची निवड करावी, असा पेच होता. मात्र हा तिढा अखेर मुख्यमंत्र्यांनी सोडवला आणि चिठ्ठीद्वारे आनंद नाईक यांच्या नावाची घोषणा केली. अन आनंद नाईक ‘लकी’ ठरले.

दोन्ही नगरसेवक दुसऱ्यांदा फोंडा पालिकेवर निवडून आले आहेत. त्यामुळे कुणाला पहिल्यांदा संधी द्यायची, हा प्रश्‍न होता. गुरुवार, १८ रोजी उमेदवारी अर्ज सादर करायची मुदत असून शुक्रवार,१९ रोजी नगराध्यक्षाची निवड जाहीर करण्यात येईल. यावेळेला शक्यतो एकच उमेदवारी अर्ज नगराध्यक्षपदासाठी येण्याची शक्यता असल्याने ही निवड बिनविरोध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

माजी नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त झाले होते. रितेश नाईक यांच्यानंतर प्रत्येकी वर्षासाठी इतर चारजणांना नगराध्यक्षपद द्यायचे, असा अलिखित करार झाला होता. त्यानुसार रितेश नाईक यांनी राजीनामा दिला होता.

नवीन नगराध्यक्ष पदासाठी आनंद नाईक तसेच वीरेंद्र ढवळीकर यांच्यात चुरस होती. दोन्ही नगरसेवक दोनवेळा निवडून आल्यामुळे कुणाला पहिल्यांदा नगराध्यक्ष करायचे, हा पेच निर्माण झाल्यानंतर शेवटी मुख्यमंत्र्यांनी फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक तसेच माजी नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्या उपस्थितीत आनंद नाईक व वीरेंद्र ढवळीकर यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या आणि आनंद नाईक ‘लकी’ ठरले.

विधानसभा भवनातच हा चिठ्ठीचा कार्यक्रम झाला. यावेळी नगरसेवक विश्‍वनाथ दळवी, रूपक देसाई तसेच दोन्ही उमेदवार आनंद नाईक व वीरेंद्र ढवळीकर उपस्थित होते.

दरम्यान, फोंड्याचे नगरसेवक रितेश नाईक यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकासकामे मार्गी लावली. फोंड्याचा कायापालट करण्याचा ध्यास त्यांनी बाळगून कृषीमंत्री रवी नाईक तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या तसेच अन्य मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली फोंड्यात अनेक कामे मार्गी लावली.

‘सीएसआर'' निधीखाली तर रितेश नाईक यांनी उद्याने उभारली, पालिकेला रुग्णवाहिका, शववाहिका, शव शीतपेटी तसेच प्लास्टिक निर्मूलनासाठी कापडी पिशव्या देणारे मशीन शहरात चार ठिकाणी उपलब्ध करून दिले. आता पुढील कार्यकाळासाठी ठरलेल्या नगराध्यक्षांनी या कामाची री ओढायची गरज आहे.

आनंद नाईक, नगरसेवक, फोंडा पालिका

फोंडा पालिकेवर दोनवेळा निवडून आल्यामुळे मला नगराध्यक्षपदाची संधी प्राप्त होणार आहे. माझ्या लोकांप्रती काम करण्याच्या प्रामाणिक सेवेचा हा एकप्रकारे गौरवच आहे. कृषीमंत्री रवी नाईक तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या कार्यकाळात पालिका क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देईन. माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रितेश नाईक यांच्या काळातील विकासकामे पुढे नेली जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT