New Mandovi Bridge Dainik Gomantak
गोवा

New Mandovi Bridge: नवा मांडवी पूल बंद ठेवण्याची तारीख लांबली, दहावीच्या परीक्षेमुळे बांधकाम खात्याचा निर्णय

Mandovi Bridge: गोव्यातील महत्त्वाचा वाहतूक दुवा असलेला नवा मांडवी पूल दुरुस्तीच्या कामासाठी १८ मार्चपासून चार ते पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोव्यातील महत्त्वाचा वाहतूक दुवा असलेला नवा मांडवी पूल दुरुस्तीच्या कामासाठी १८ मार्चपासून चार ते पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना वाहतुकीस अडथळा होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्तक्षेपानंतर सार्वजनिक बांधकाम खात्यानं (PWD) ही तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला पूल मार्चच्या पहिल्या आठवड्यात बंद ठेवण्याचा विचार होता.

मात्र, परीक्षेच्या काळात वाहतूककोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला. दुरुस्तीच्या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक खात्यानं नागरिकांना केलं आहे.

नवा मांडवी पूल हा पणजी शहर आणि उत्तर गोव्याला जोडणाऱ्या प्रमुख मार्गांपैकी एक आहे. त्यामुळं दुरुस्तीच्या काळात पर्यायी वाहतूक व्यवस्थेची सोय करण्यात आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध विरोधकांचं 'महाभियोग' अस्त्र; 193 खासदारांच्या स्वाक्षरीसह संसदेत नोटीस दाखल

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

Dwidwadashy Yog 2026: शुक्र-मंगळचा अद्भुत 'राजयोग'! 'या' 3 राशींच्या नशिबात स्वतःच्या घराचं सुख; गुंतवणुकीतूनही मिळणार बक्कळ नफा

काव्या मारनचा 'तो' निर्णय अंगलट! पाकिस्तानी खेळाडूची खरेदी अन् सनरायझर्स टीमचं ट्विटर खातचं सस्पेंड; भारतीय चाहत्यांकडून संताप

India LPG Price Hike: जागतिक स्तरावर इंधनदराचा भडका, पण भारतात सरकारकडून दिलासा; 60 रुपयांच्या एलपीजी दरवाढीमागील खरी मेख काय?

SCROLL FOR NEXT