Goa BJP State President Damu Naik Dainik Gomantak
गोवा

Kushavati District: "पायाभूत सुविधा निर्माण होतील, स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील"! ‘कुशावती’वरून दामूंचे स्पष्टीकरण

Damu Naik on Third Kushavati District: तवडकर हे छत्तीसगड येथे असल्याने आणि माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे पत्रकार परिषदेला उशिरा पोचल्याने सहभागी होऊ शकले नाहीत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सरकारने तयार केलेल्या नवीन कुशावती जिल्ह्याचे प्रदेश भाजपने स्वागत केले. यामुळे या भागात नवीन पायाभूत सुविधा निर्माण होतील; परिणामी स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला.

दरम्यान, काणकोणमधून या तिसऱ्या जिल्ह्यात काणकोण तालुक्याचा समावेश करण्यास विरोध होत असतानाच काणकोणचे विधानसभेच प्रतिनिधीत्व करणारे आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी तिसऱ्या जिल्ह्याचे स्वागत व्हिडिओ जारी करून केले.

पत्रकार परिषदेला माजी खासदार विनय तेंडुलकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई आणि आमदार नीलेश काब्राल होते. तवडकर हे छत्तीसगड येथे असल्याने आणि माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे पत्रकार परिषदेला उशिरा पोचल्याने सहभागी होऊ शकले नाहीत.

नाईक म्हणाले, विरोध करणारे सगळ्याला विरोध करतात. याआधी त्यांनी कोकण रेल्वे, विमानतळ, मांडवीवरील तिसरा पूल या साऱ्याना विरोध केला होता. १६ लाख लोकसंख्या राज्‍याची असली तरी १ कोटी पर्यटक ये जा करत असतात हे लक्षात घ्यावे. त्यासाठी सुविधांत वाढ होणे आवश्यक आहे. केंद्राकडून जिल्हानिहाय विकास निधी दिला जात असल्याने तिसऱ्या जिल्ह्याच्या विकासासाठी थेट निधी मिळणे सुकर झाले आहे.

‘कुशावती’ नाव योग्यच!

मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले की, कुशावती जिल्ह्यामुळे केपे, सांगे, काणकोण आणि धारबांदोडा येथील लोकांना शिक्षण, नोकरी किंवा अन्य सरकारी कामांसाठी मडगावला जावे लागणार नाही. कुशावती नदीकाठी प्राचीन काळापासून संस्कृती बहरली होती, त्यामुळे नवीन जिल्ह्याला ‘कुशावती’ हे नाव देणे पूर्णतः योग्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT