Old GMC Panjim Goa Dainik Gomantak
गोवा

पणजीत जुन्या गोमेकॉसमोर फूड ट्रक झोन

17 विषय अजेंड्यावर; महापालिकेची उद्याची बैठक अनेक मुद्यांनी गाजणार

दैनिक गोमन्तक

पणजी : महापालिकेची 12 रोजी सर्वसाधारण बैठक होणार आहे. या बैठकीत 17 विषय अजेंड्यावर असतील. त्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जुन्या गोमेकॉसमोरील मांडवी नदी किनारी असणाऱ्या पदपथावर फूड ट्रक झोन करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. यापूर्वी हटविलेल्या गाडेधारकांचा अद्याप प्रश्‍न सुटलेला नसतानाच महापालिका फूड ट्रक झोनचा विषय पुढे आणत आहे.

जर हा फूड ट्रक झोन झाला तर पणजीतील बांदोडकर मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे या विषयावर बैठकीमध्ये गदारोळ होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय 15 नव्या वैयक्तिक घरांना शौचालये बांधण्याचा परवानगी देणे, महापालिका मार्केट ते आयनॉक्स, त्याशिवाय मार्केट ते डॉन बॉस्को हायस्कूल हा मार्ग एकेरी करण्यावर मान्यता घेतली जाणार आहे. या बैठकीत वाहतूक बेटांचे सुशोभीकरण व देखभाल, सल्लागाराची नेमणूक, बहुउद्देशीय कार पार्किंग इमारत उभारणे, केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या निधीचा विकासकामांच्या खर्चावर मान्यता घेणे, मार्केटमधील दुरुस्तीची कामे यांना मंजुरी घेण्यात येणार आहे.

भाडेकराराचा विषयही गाजणार

महापालिकेच्या या बैठकीत मार्केटमधील दुकानदारांच्या भाडेकराराच्या विषयावरही चर्चा होणार आहे. महापालिका इमारतीत बाजार समिती अध्यक्षांच्या कक्ष नूतनीकरणाचे काम सुरू झाल्यापासून नवे अध्यक्ष महापालिकेत नजरेसच पडत नाहीत. त्यामुळे भाडेकराराचा विषयही गाजू शकतो.

मार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता

जुन्या गोमेकॉसमोर मांडवी किनाऱ्यावरील पदपथावर फूड ट्रक झोन करण्याचा प्रस्ताव आला तरी त्यास दोन्ही बाजूच्या नगरसेवकांचा विरोध होण्याची दाट शक्यता आहे. भाऊसाहेब बांदोडकर मार्गावर गणेशोत्सवाच्या काळात ज्याप्रमाणे फेरीवेळी वाहनांची गर्दी असते, अशी गर्दी फूड पार्क झाल्यानंतर दिसू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT