Cutbona Jetty Fishing Season Dainik Gomantak
गोवा

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

South Goa Fishing Season: कुटबण जेटीवर इतर राज्यांतून येणाऱ्या कामगारांची पडताळणी करण्यासाठी प्रशासनाने हेल्प डेस्क सुरू केला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: नवीन मासेमारी हंगाम शनिवार, १ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याने दक्षिण गोव्यातील सर्वांत मोठी मच्छीमारी जेटी असलेल्या कुटबण जेटीवर लगबग सुरू झाली आहे. नव्या हंगामासाठी बोटींची दुरुस्ती, जाळ्यांची व्यवस्था आणि इतर आवश्यक कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.

सध्याच्या अनिश्चित, लहरी हवामानामुळे आगामी हंगामातील मासळी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याची चिंता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. ट्रॉलर्सची दुरुस्ती व देखभालीची कामे अंतिम टप्प्यात असून, हंगाम सुरू होण्यापूर्वी नौका सज्ज ठेवण्यासाठी बोटमालक प्रयत्नशील आहेत, असे बोटमालक संघटनेचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी सांगितले.

मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी तसेच सागरी संसाधनांचे संवर्धन करण्यासाठी वार्षिक मासेमारी बंदीचा कालावधी सध्याच्या ६० दिवसांवरून ९० दिवस करण्यात यावा, अशी मागणी मच्छीमारांनी पुन्हा एकदा केली आहे. मच्छीमार वासुदेव केरकर यांनी सरकारने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. बंदीचा कालावधी वाढल्यास मासळीच्या पुनरुत्पादनासाठी अधिक वेळ मिळेल, असे त्यांनी सांगितले.

कामगारांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर

कुटबण जेटीवर इतर राज्यांतून येणाऱ्या कामगारांची पडताळणी करण्यासाठी प्रशासनाने हेल्प डेस्क सुरू केला आहे. २५ जुलैपासून कामगारांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर राबविण्यात येत असून, आत्तापर्यंत सुमारे दीडशे कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. डॉक्टर चैताली शिरोडकर यांनी ही माहिती दिली. हंगामपूर्व तयारीचा भाग म्हणून नौका मालकांना वैद्यकीय किटचे वाटपही करण्यात आले.

कामगारांची वानवा कायम : डिसिल्वा

ओडिशा, आसाम आणि झारखंड येथून मासेमारी कामगार येण्यास सुरुवात झाली असली, तरी त्यांची संख्या कमीच आहे. बहुतांश कामगार आपल्या मूळ राज्यात भातशेती व इतर शेतीकामांमध्ये व्यस्त असल्याने जेटीवर मजुरांची कमतरता जाणवत असल्याचे ट्रॉलरमालक सावियो डिसिल्वा यांनी सांगितले.

ट्रॉलर्समालकांना वाढत्या स्पर्धेची चिंता

नवीन मासेमारी जहाजांना मोठ्या प्रमाणात परवानग्या दिल्यामुळे जुन्या ट्रॉलर्समालकांसमोरील अडचणी वाढल्याचा आरोप सावियो डिसिल्वा यांनी केला. पूर्वी सुमारे दोन हजार मासेमारी जहाजांची नोंदणी होती; मात्र आता परवानग्या सहज मिळत असल्याने स्पर्धा वाढली असून पारंपरिक मच्छीमारांवर त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT