Borim Stadium  Canva
गोवा

Borim News: तीन वर्षात बोरी पूल उभा राहिल! मैदानाचीही मागणी पूर्ण करू; मंत्री शिरोडकरांचे आश्वासन

Minister Subhash Shirodkar: केंद्राकडून मिळणाऱ्या ४०० कोटींचा निधी खर्चून येत्या तीन वर्षांत नवीन पूल तयार होऊन नागरिकांना उपलब्ध होणार आहे. बोरी येथे मैदानाची आवश्यकता असून तीही मागणी लवकरच पूर्ण करण्यात येईल,असे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

शिरोडा: बोरी येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या प्रकल्पाची प्रक्रिया पूर्ण झाली असून केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्याने यासाठी लागणारी जागाही संपादित केली आहे. केंद्राकडून मिळणाऱ्या ४०० कोटींचा निधी खर्चून येत्या तीन वर्षांत नवीन पूल तयार होऊन नागरिकांना उपलब्ध होणार आहे. बोरी येथे मैदानाची आवश्यकता असून तीही मागणी लवकरच पूर्ण करण्यात येईल,असे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

शिरोडा मतदार संघातील सहा विकलांगांना भारत सी एस आर नेटवर्क यांच्यातर्फे सहा जणांना ई बाईक वितरण करण्यात आल्या. त्यावेळी मंत्री शिरोडकर बोलत होते.

गोव्यातील काही पंचायतीमधील आठ पंचायतींना क्लीन व ग्रीन गोवा पुरस्कार लाभलेला आहे .त्यापैकी शिरोडा पंचायतीचा समावेश असून शिरोडा पंचायतीला क्लीन व ग्रीन गोवा पुरस्कार लाभलेला आहे तो केवळ नागरिकांमुळे.

यापुढेही नागरिकांनी असेच सहकार्य करून आपला शिरोडा स्वच्छ ठेवण्यात हातभार लावावा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.शिरोडा येथील श्री गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री सुभाष शिरोडकर बोलत होते.

यावेळी भारत सीएसआर नेटवर्कचे साजिद सय्यद, जिल्हा अधिकारी चंद्रकांत शेटकर, बोरी पंचायतीचे सरपंच जयेश नाईक, पंचवाडी पंचायतीच्या सरपंच लीना फर्नांडिस, शिरोडा पंचायतीच्या सरपंच पल्लवी शिरोडकर, बेतोडाचे सरपंच मधु खांडेपारकर तसेच डॉ.गौरी शिरोडकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT