Goa News: खासदार विरिअटो फर्नांडिस यांचा फॉर्म 'अनमॅप'

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील घडामोडी; राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि महत्वाच्या बातम्या
Goa Live News Update
Goa Live News UpdateDainik Gomantak

वास्कोतील कॅनरा बँकेत चोरीचा प्रयत्न; बाथरुमची खिडकी तोडून प्रवेश

वास्को शहरातील कॅनरा बँकेच्या (Canara Bank) शाखेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी वास्को पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

डिचोलीत महिलेचे मंगळसूत्र लुबाडणाऱ्या 'त्या' तोतया पोलिसांना अटक

डिचोलीत महिलेचे मंगळसूत्र लुबाडणाऱ्या 'त्या' तोतया पोलिसांना अटक. डिचोली पोलिसांची 'फिल्मी स्टाईल'ने अस्नोडा परिसरात कारवाई. गुलाम शिराज (सांगली) आणि असादुल्लाह अली खान (कर्नाटक) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे. विविध चोऱ्यात हात असल्याचा संशय.

गोव्याच्या किनाऱ्यांवर 22 पर्यटकांना जलसमाधीपासून वाचवले

नवीन वर्षाच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गोव्यात आलेल्या पर्यटकांची किनाऱ्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. या पहिल्याच आठवड्यात (१ आणि ४ जानेवारी २०२६ दरम्यान), गोव्याच्या विविध किनाऱ्यांवर बुडणाऱ्या २२ पर्यटकांना 'दृष्टी मरिन'च्या जीवरक्षकांनी सुखरूप बाहेर काढले आहे.

लुथरा बंधूंच्या जामीन अर्जावर आता 13 जानेवारीला सुनावणी

सौरभ आणि गौरव लुथरा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. मात्र, या प्रकरणातील गुंतागुंत आणि पीडित कुटुंबांचा वाढता विरोध पाहता, न्यायालयाने सुनावणी १३ जानेवारी २०२६ पर्यंत पुढे ढकलली (Adjourn) आहे.

"जिथे बोलणे कर्तव्य आहे, तिथे गप्प राहणे हा गुन्हा"; न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांचे मार्मिक उद्गार

झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयातर्फे भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी त्यांनी न्यायव्यवस्था आणि कायदेतज्ज्ञांच्या कर्तव्यावर भाष्य करताना एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला.

"सरकारी नोकरी मिळाल्यावर पदाचा गैरवापर करू नका"; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा तरुणांना कडक इशारा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नवनियुक्त सरकारी कर्मचारी आणि गोव्यातील तरुणांना मोलाचा सल्ला देतानाच कडक शब्दात समजही दिली आहे. नोकरी मिळाल्यानंतर शिस्त आणि जबाबदारीने वागणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला.

वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी स्नेहाचा गौरव केला

वास्को आणि संपूर्ण गोव्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की, वास्को येथील स्नेहा यादव हिची सीमा सुरक्षा दलात (BSF) निवड झाली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण भरती प्रक्रियेतून बीएसएफमध्ये निवडली जाणारी ती गोव्यातील एकमेव उमेदवार ठरली आहे. वास्कोचे आमदार कृष्ण (दाजी) साळकर यांनी स्नेहाचा गौरव केला असून तिचे यश गोव्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.

न्यायमूर्ती संदीप शिंदे गोव्याचे नवे लोकायुक्त; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या लोकायुक्त पदासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे. भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवला

गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका ४१ वर्षीय फिलीपिन्सच्या नागरिकाला आणि त्याला मदत करणाऱ्या एका स्थानिक साथीदाराला अटक केली आहे. बनावट ओळख निर्माण करून भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे.

झॅनिटो कार्डोझोच्या जामिनाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका; कोर्टाची नोटीस जारी

उत्तर गोवा सत्र न्यायालयाने झॅनिटो कार्डोझोला एका खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात मंजूर केलेल्या जामिनाला आता उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने झॅनिटो कार्डोझोला नोटीस बजावली आहे.

"IAS आणि IPS होण्याचे स्वप्न पहा"; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गोमंतकीय तरुणांना आवाहन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील तरुणांना केवळ स्थानिक नोकऱ्यांच्या मागे न धावता IAS (भारतीय प्रशासकीय सेवा) आणि IPS (भारतीय पोलीस सेवा) यांसारख्या उच्च पदांचे लक्ष्य ठेवण्याचे आवाहन केले आहे. गोव्यातील तरुणांमध्ये मोठी क्षमता असून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

खासदार विरिअटो फर्नांडिस यांचा फॉर्म 'अनमॅप'

दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरिअटो फर्नांडिस यांच्या संदर्भात सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेवर निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'विशेष नोंदणी मोहिमे' (SIR) दरम्यान, खासदारांचा इन्युमरेशन फॉर्म तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण आढळल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com